कोरोनाचे कारवारमध्ये ९ रुग्ण

Dainik Gomantak
मंगळवार, 19 मे 2020

मुंबईतून एक युवक गोव्यात आला. तो इतर ११ जणांसोबत चालत माजाळीपर्यंत आला होता.

चैतन्य जोशी

कारवा

कारवार जिल्ह्यात आज आणखी  ९ जण कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ हरीश कुमार के यानी दिली. ते म्हणाले जरी  ९ जण संक्रमित आढळले असले तरी लोकांनी घाबरण्याचे काही कारण नाही. हे लोक कुठून संक्रमित झाले ते आम्हाला समजले आहे त्या मुळे सर्वांचे अलगीकरण करून संक्रमण आणि फैलावणार नाही याची काळजी घेतली आहे.
ते म्हणाले, या पैकी चार जण होन्नावरचे आहेत दोघे भटकळ चे असून दोघे मुंडगोड तालुक्यातील आहेत होन्नावरला सात जण मुंबईतून आले होते त्या पैकी चार जण संक्रमित आहेत. मुंडगोड चे दोघे मुंबई एका हॉटेलमध्ये कामाला होते. भटकळ चे संक्रमित हे संक्रमित कुटुंबातील आहेत सर्वाना अलगीकरण करून ठेवले आहे. भटकळ मधील मुलीला तिच्या आई पासून लागण झाली असून आणखी एक व्यक्ती मुंबईहून होन्नावरला आली आहे त्याना होन्नावरच्या अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे त्यांच्या घशातील द्रव तपासणीला पाठविण्यात आला होता तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मुंबईतून एक युवक गोव्यात आला. तो इतर ११ जणांसोबत चालत माजाळीपर्यंत आला होता. त्या सर्वांना अलगीकरण करून ठेऊन चाचणी केली असता एकाला लागण झाल्याचे आढळून आले आहे.

संबंधित बातम्या