Madhya Pradesh: विकृतीचा कळस! लिफ्टच्या बहाण्याने 92 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार

शहडोल येथे नातेवाईकाच्या घरी आलेल्या 92 वर्षीय वृद्ध महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तीने तिला जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
Crime
Crime Dainik Gomantak

मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. 92 वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची एक घटना घडली आहे.

शहडोल येथे नातेवाईकाच्या घरी आलेल्या 92 वर्षीय वृद्ध महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तीने तिला जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

वृद्ध महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. तसेच, वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Crime
CRPF Volleyball: काश्मिरमध्ये हिमवृष्टीत व्हॉलीबॉल खेळतानाचा जवानांचा व्हिडिओ व्हायरल...

पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी चोवीस तासांच्या आत आरोपीला पकडले. पोलिस पथकाने आरोपीवर 40 हजार रुपयांचे बक्षीसही ठेवले होते. घटनास्थळाच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीला पकडण्यात आले.

आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी घटना स्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. जुगवारी, बांधवाबाडा, चांदनिया, अंतरा, अंतरी, झगरहा, खौहई या गावातील आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू केला. दरम्यान, चोवीस तासांच्या आत आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.

Crime
Manish Sisodia: एक दिवसांपूर्वी केजरीवालांना नोटीस आज मंत्री सिसोदियांच्या घरी CBI चा छापा

मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील एक 92 वर्षीय वृद्ध महिला ट्रेनमध्ये चढल्यानंतर शहडोल येथे तिच्या नातेवाईकाच्या घरी आली. स्टेशनवर उतरून ही महिला घरी जात होती. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्धेला जंगलात नेऊन बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला आणि वृद्धेला तेथेच सोडून पळ काढला.

महिला जंगलातून भटकत, जुन्या लोकवस्तीच्या रस्त्यावर आली आणि तिने घडलेली हकिकत लोकांना सांगितली. लोकांनी याबाबत वृद्धेच्या नातेवाईकांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या नातेवाईकांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली, तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com