जम्मू-काश्मीर पोलिस पदकावरुन शेख अब्दुल्ला यांचे हटवले छायचित्र

देशाच्या फाळणीनंतर काश्मीरच्या विलीनीकरणात शेख मोहम्मद अब्दुल्ला (Sheikh Abdullah) यांनी मोलाची भूमिका निभावली.
Sheikh Abdullah
Sheikh AbdullahDainik Gomantak

देशाच्या फाळणीनंतर काश्मीरच्या विलीनीकरणात शेख मोहम्मद अब्दुल्ला यांनी मोलाची भूमिका निभावली. मात्र भाजप सरकारने त्यांच्या शौर्याचा अपमान केला आहे. जम्मू-काश्मीर पोलिस पदकावरील त्यांचे छायाचित्र हटवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. (A photograph of Sheikh Abdullah on the Jammu and Kashmir Police Medal has been deleted)

दरम्यान, माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्या पोर्ट्रेटच्या जागी राष्ट्रचिन्ह लावण्यात आले आहे. त्याचबरोबर शेख अब्दुल्ला (Sheikh Abdullah) यांच्या नावावर असलेल्या 'शेर-ए-काश्मीर' पदकाचे नाव जम्मू आणि काश्मीर पोलीस पदक असे करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर शेख अब्दुल्ला यांनी स्थापन केलेल्या नॅशनल कॉन्फरन्ससह इतर प्रादेशिक पक्षांनी जोरदार टीका केली आहे. या निर्णयावर टीका करणाऱ्या पक्षांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा दीर्घकाळचा प्रतिस्पर्धी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) यांचा समावेश आहे.

Sheikh Abdullah
Jammu And Kashmir:....दहशतवादाविरोधात मोहीम राबवा, अमित शाहांचे निर्देश

विशेष म्हणजे, 1947 मध्ये शेख अब्दुल्ला यांनी द्वि-राष्ट्र सिद्धांत नाकारला होता. हा मुस्लिम बहुल प्रदेश भारताचा भाग झाला याची खात्री केली. शेख अब्दुल्ला यांचे छायाचित्र बदलण्याचे आदेश जम्मू-काश्मीरच्या गृह विभागाने जारी केले आहेत. त्यात म्हटले आहे की, "पदकाच्या एका बाजूला शेर-ए-काश्मीर शेख मोहम्मद अब्दुल्ला यांची नक्षीदार प्रतिमा भारत सरकारच्या बोधचिन्हाने बदलली जाईल."

दरम्यान, शेख अब्दुल्ला हे काश्मीरच्या भारतीय संघराज्यातील प्रवेशाचे नेते राहिले आहेत. याशिवाय, ऑक्टोबर 1947 मध्ये काश्मीरवर कब्जा करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानी आक्रमणकर्त्यांचा हल्ला हाणून पाडण्याचे श्रेयही त्यांना जाते. हल्लेखोरांच्या हल्ल्यानंतर महाराजा हरिसिंग काश्मीरमधून पळून गेले, तेव्हाही शेख पाकिस्तानी हल्लेखोरांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले.

Sheikh Abdullah
Jammu and Kashmir: बांदीपोरामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश, एक दहशतवादी ठार

तसेच, शेख अब्दुल्ला यांनी मोहम्मद अली जिना (Muhammad Ali Jinnah) यांच्या धर्माच्या आधारे भारताचे विभाजन करण्याच्या द्विराष्ट्रीय सिद्धांताला कडाडून विरोध केला. त्यांनी धर्मनिरपेक्ष राज्याचा भाग बनण्याचा निर्णय घेतला. जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) राजकीय पक्षांचा असा विश्वास आहे की, शेख अब्दुल्ला यांचे छायाचित्र काढून टाकणे आणि पोलीस पदकाचे नाव बदलण्याने त्यांचे योगदान "मिटवू" शकत नाही.

Sheikh Abdullah
Jammu And Kashmir: अमरनाथ यात्रेच्या मार्गावर झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार

दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्सने (National Conference) पक्षाचे संस्थापक शेख अब्दुल्ला यांचे छायाचित्र जम्मू-काश्मीर पोलीस पदकावरुन हटवणे हा इतिहास पुसून टाकण्याचा कुटील प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ते लोकांच्या हृदयावर अधिराज्य करतात, असे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रदेश प्रवक्ते इम्रान नबी दार म्हणाले. "आम्हाला राष्ट्रीय चिन्हांबद्दल पूर्ण आदर आहे, आमचा इतिहास, ओळख आणि चिन्हे पुसून टाकण्याचा हा प्रयत्न कुटीलपणा दर्शवतो." दार पुढे म्हणाले की, नाव बदलल्याने काहीही बदलणार नाही. नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला काश्मीरी लोकांच्या हृदयावर राज्य करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com