MonkeyPox: देशाची चिंता वाढली! केरळमध्ये आढळला मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण

केरळमध्ये देशातील दुसरा मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला आहे.
Monkey Pox
Monkey PoxDainik Gomantak

केरळमध्ये (Kerala) देशातील दुसरा मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला आहे. हा 31 वर्षीय तरुण गेल्या आठवड्यात दुबईहून केरळमध्ये आला होता, त्यानंतर त्याला मंकीपॉक्स पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी याबाबतची माहिती दिली आहे. केरळमध्ये आढळून आलेला मंकीपॉक्सचा हा दुसरा रुग्ण असून, देशामधील ही दुसरी घटना आहे. (A second case of monkeypox has been detected in Kerala)

Monkey Pox
Muhammad Zubair ला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, बुधवारपर्यंत कारवाईला स्थगिती

केरळमध्येच याचे पहिले प्रकरण आढळून आले आहे. मंत्री म्हणाले की, 13 जुलै रोजी केरळमध्ये आलेला रुग्ण कन्नूरचा रहिवासी आहे आणि तिथल्या परियाराम मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. मंत्री म्हणाले की रुग्णाच्या जवळच्या संपर्कात असलेल्या सर्वांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या आठवड्यात कोल्लम जिल्ह्यातून मंकीपॉक्सच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना करण्यात राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी केरळला एक उच्चस्तरीय बहु-अनुशासनात्मक पथक पाठवले आहे.

केरळच्या कोल्लम जिल्ह्यातून मंकीपॉक्स रोगाची पुष्टी झाल्याच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्रालयाने केरळ राज्य सरकारला तपासात आणि सार्वजनिक आरोग्याच्या आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मदत करण्यासाठी एक बहु-अनुशासनात्मक केंद्रीय पथक नियुक्त करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

Monkey Pox
SpiceJetच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल, विमानसेवा थांबवण्याची मागणी

केरळमध्ये मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने रविवारपासून राज्यातील पाचही विमानतळांवर सुरक्षा वाढवली आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांची तपासणी केली जात आहे तर कन्नूर विमानतळावर विशेष सुविधा उभारण्यात आल्या आहेत. देशात मंकीपॉक्सची पहिली केस केरळमध्येच आढळून आली होती.

कोल्लम जिल्ह्यातील एका 35 वर्षीय पुरुषाला, जो मध्य पूर्वेतील एका देशातून आला होता, त्याची मंकीपॉक्सची चाचणी पॉजिटिव्ह आली आणि त्याला तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

तसेच रुग्णाचा नमुना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या आठवड्यात आरोग्य विभागाच्या विविध पथकांसोबत बैठक घेऊन राज्यातील मंकीपॉक्स विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या.

देशात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. आत्तापर्यंत जगातील 27 देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात त्याचे रुग्ण मिळणे ही सरकारसाठी चिंतेची बाब असल्याचे वर्तवले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com