
A shocking video of a woman force-feeding her pet puppy beer has gone viral on social media: एका महिलेने आपल्या पाळीव कुत्र्याच्या पिल्लाला जबरदस्ती बिअर पाजल्याचा एक संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्ससाठी लोक कुठल्या थराला जातील याची आता मर्यादा राहिली नाही. या घटनेमुळे प्राणी प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या दीपिका नारायण भारद्वाज यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला कुत्र्याच्या पिल्लाला हातात धरून बळजबरीने बिअर पाजताना दिसत आहे. महिलेने पिल्लाच्या तोंडात बिअर ओतल्यानंतर पिल्लू धडपडताना दिसत आहे.
हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर डेहराडून पोलिसांनी नेहरू कॉलनी पोलिस ठाण्यात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यातंर्गत एफआयआर नोंदवला आणि तपास सुरू केला.
ही महिला डेहराडूनच्या रेसकोर्समध्ये राहायला असून, ती एका रेस्टॉरंटमध्ये काम करते. 'डोरा अॅनिमल वेल्फेअर' या प्राणी कल्याणकारी संस्थेने या प्रकरणाची माहिती दिली, त्यानुसार हा व्हिडिओ 11 ऑगस्ट रोजी शूट करण्यात आला होता.
"गेल्या महिन्यापासून आम्ही महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु तिने आमच्या कॉल आणि मेसेजला प्रतिसाद दिला नाही. आम्ही तिला माफी मागण्याची मागणी केली पण तिने प्रतिसाद दिला नाही.
आम्ही आमच्या इंस्टाग्राम हँडलवर व्हिडिओ पोस्ट केला आणि डेहराडून पोलिसांना टॅग केले. अखेर मंगळवारी तिची आमची भेट झाली. त्यानंतर तिने इन्स्टा अकाउंट डिलीट केले आहे," असे 'डोरा अॅनिमल वेल्फेअर';च्या वंश त्यागी यांनी सांगितले.
हे कुत्र्याचे पिल्लू "आरोपीच्या एका मित्राच्या मालकीचे आहे", असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले की "अल्कोहोलमुळे पिल्लाच्या आरोग्यावर कोणता परिणाम झाला आहे की नाही हे लगेच निश्चित करणे शक्य नाही".
दरम्यान, कुत्र्याच्या पिल्लाच्या मालकाने असा दावा केला की जेव्हा कथित व्हिडिओ बनवला तेव्हा तो घटनास्थळी उपस्थित नव्हता.
कुत्र्यांना कधीही बिअर किंवा कोणत्याही प्रकारचे अल्कोहोलयुक्त पेय देऊ नये. कुत्र्यांनी अल्कोहोलचे सेवन केल्याने त्यांच्यासाठी गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
अगदी थोड्या प्रमाणात अल्कोहोल देखील उलट्या, अतिसार, अशक्तपणा, श्वास घेण्यात अडचण यासारख्या लक्षणांना कारणीभूत ठरू शकते आणि त्यांचा यामुळे मृत्यू होऊ शकतो.
आपल्या पाळीव प्राण्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, त्यांना अल्कोहोलयुक्त पेयांपासून दूर ठेवावे. जर तुम्हाला शंका असेल की तुमच्या कुत्र्याने अल्कोहोलचे सेवन केले आहे, तर त्वरित मार्गदर्शन आणि मदतीसाठी तुमच्या पशुवैद्यकाशी संपर्क साधा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.