Delhi: पुन्हा तुकडे, फ्रीज अन् दिल्ली! मुलाच्या मदतीने महिलेने केले पतीच्या शरीराचे 22 तुकडे, पाहा Video

दिल्ली पोलिसांनी महिला आणि तिच्या मुलाला अटक केली आहे.
Delhi Crime News
Delhi Crime NewsDainik Gomantak

दिल्लीत झालेले श्रद्धा वालकर हत्या प्रकरण संपूर्ण देशात गाजत असताना, आता त्यासारखीच दुसरी एक घटना समोर आली आहे. महिलेने आपल्या मुलाच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. दोघांनी मृतदेहाचे 22 तुकडे केले, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले आणि पूर्व दिल्लीतील अनेक भागात फेकून दिले आहेत. दिल्ली पोलिसांनी महिला आणि तिच्या मुलाला अटक केली आहे. पतीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याने हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

(A woman along with her son arrested for murdering her husband. They chopped off body in several pieces)

Delhi Crime News
Afghanistan: जगण्यासाठी पोटच्या मुलींसह, स्वत:ची किडनी, मूत्रपिंड विकताहेत अफगाणी नागरिक

पांडव नगर येथील रहिवासी अंजन दास यांची या वर्षी जूनमध्ये हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून घरातील रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर दररोज मृतदेहाचे तुकडे पांडवनगर आणि पूर्व दिल्लीतील वेगवेगळ्या भागात फेकले जात होते. पूनम आणि तिचा मुलगा दीपक यांनी ही हत्या केली.

Delhi Crime News
Elon Musk Tweet Viral: युपी पोलिसांचे एलन मस्कच्या ट्विटला भन्नाट रिप्लाय, सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, अवैध संबंधातून ही हत्या करण्यात आली आहे. मृतदेहाचे तुकडे घेऊन जातानाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. आरोपी पूनम आणि तिचा मुलगा दीपक यांनी जूनमध्ये अवैध संबंधातून दासची हत्या केली. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com