COVID-19 लसीकरणासाठी आता आधार कार्डची गरज नाही: UIDAI चे स्पष्टीकरण 

दैनिक गोमंतक
सोमवार, 17 मे 2021

युआयडीएआयने (UIDAI) स्पष्ट केल आहे की, जर एखाद्याकडे आधार कार्ड (Aadhar card) नसेल तर त्याला कोरोनाची लस घेण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. 

देशात कोरोनाची दुसरी लाट (second wave of corona) आली आहे. त्यामुळे लसीकरणाचा  वेग वाढवला आहे. आधी आधार कार्ड (Aadhar card) असणाऱ्यां व्यक्तीलाच लस दिली जाणार होती, परंतु आता युआयडीएआयने (UIDAI) स्पष्ट केल आहे की, जर एखाद्याकडे आधार कार्ड (Aadhar card) नसेल तर त्याला कोरोनाची लस घेण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. म्हणजेच एखाद्या व्यक्तिकडे जर आधार कार्ड नसेल तर त्या व्यक्तीला लस घेता येणार आहे. त्यासोबतच केवळ आधार कार्ड नसलेल्या व्यक्तीला रुग्णालयात भरती न करून घेणे किंवा औषध आणि उपचारांची सेवा देण्यास नकार देण यासारख्या गोष्टीवर आता बंदी आणली आहे. कोणत्याही रुग्णाला आता आधार कार्ड बंधनकारक नसणार असे  माहिती दिली आहे. (Aadhar card is no longer required for vaccination)

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन
     
अत्यावश्यक सुविधांसाठी आता आधार कार्डची गरज नाही-
देशात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ होत असताना युआयडीच हा निर्णय अतिशय महत्वाचा मानला जात आहे. या पूर्वी केवळ आधार कार्ड नसल्यामुळे लोकाना अनेक अत्यावश्यक सेवांपासून आणि अनेक गोष्टीपासून वंचित ठेवले जात होते. अनेक कोरोना रुग्णाना केवळ आधार कार्ड नसल्याने त्यांना रुग्णालयात भारती केले जात नव्हते तसेच रुग्णालयातील अनेक औषध आणि उपचारासाठी अनेक अडचणीना 
तोंड ध्यावे लागत होते. परंतु युआयडीच्या या निर्णयाने आता कोणालाही अशा प्रकांच्या समस्याना तोंड द्यावे लागणार नाही. 

काँग्रेसचे खासदार राजीव सातव अनंतात विलीन 

कोरोना लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करताना आधार कार्ड नंबर टाकणे गरजेचे होते परंतु अनेकांकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत होते. तसेच रुग्णालयात भारत करताना देखील आधार कार्ड आवश्यक होते.  पण आता अशा गोष्टीकरीत आधार कार्डची गरज भासणार नसल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.         

Gujarat Earthquake: गुजरातवर दुहेरी संकट; वादळासोबतच भुकंपाचे धक्के

लसीकरणासाठी आपले ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखवणे अनिवार्य होते. त्यामुळेच ज्या लोकांकडे आधार कार्ड नाही अशा लोकाना लस मिळणार नाही का असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर गेली चार महीने सरकार व युआयडीने कोणतेच स्पष्टीकरण दिले नव्हते. त्यामुळे अनेकांच्या मनात गोंधळ  निर्माण झाला होता. परंतु आता हा प्रश्न मिटला आहे. एखाद्याकडे आधार कार्ड नसले तरी त्या व्यक्तीचे लसीकरण होणार आहे असे स्पष्ट झाले आहे.   

 

 

संबंधित बातम्या