Shraddha Walkar Murder Case
Shraddha Walkar Murder CaseDainik Gomantak

Shraddha Murder Case: आफताबचा मुक्काम आता 'तिहार'मध्ये, लवकरच होणार नार्को चाचणी

आफताबला आजच दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

श्रद्धा वालकर हत्याकांडातील (Shraddha Murder Case) मुख्य आरोपी आफताब अमीन पूनावालाची पोलीस कोठडी संपली आहे. दिल्ली न्यायालयाने शनिवारी (26 नोव्हेंबर) आफताबला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आंबेडकर हॉस्पिटलमधूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आफताबला न्यायालयात हजर करण्यात आले. आफताबला आजच दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले आहे. तसेच, आफताबची 28 नोव्हेंबरला नार्को चाचणी केली जाऊ शकते.

Shraddha Walkar Murder Case
What Is A Narco Test: आफताबची नार्को टेस्ट कधी? नार्को टेस्ट म्हणजे काय व कशी केली जाते?

आफताब अमीन पूनावाला याला शनिवारी सकाळी 10 वाजता दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. मेडिकल झाल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी पुन्हा आफताबला घेऊन आंबेडकर हॉस्पिटल गाठले. येथे त्याला एका खोलीत ठेवण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

Shraddha Walkar Murder Case
Goa Miles चालत नाही, कॅबची सुविधा नाही; कधी सुरू होणार ओला-उबर, मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर

आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट 28 नोव्हेंबरला होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पीडितेच्या मृतदेहाची डीएनए चाचणी अहवाल पोलिसांना मिळालेला नाही. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी यापूर्वी दिली आहे. तसेच, आफताबची पॉलीग्राफ चाचणी देखील होऊ शकली नसल्याची पोलिसांनी सांगितले. श्रद्धा हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आफताबने श्रद्धाचा गळा आवळून हत्या केली होती, त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून दिल्लीच्या विविध भागात फेकून दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com