AAP आमदार अमानतुल्ला खान यांना अटक

आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना अटक करण्यात आली आहे.
AAP आमदार अमानतुल्ला खान यांना अटक
Amanatullah KhanDainik Gomantak

आम आदमी पार्टीचे (AAP) आमदार अमानतुल्ला खान यांना गुरुवारी अतिक्रमणविरोधी कारवाईला विरोध केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. मदनपूर खादर येथील अतिक्रमणविरोधी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आप आमदार अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, ज्या अंतर्गत अमानतुल्लाला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज दिल्लीतील विविध भागात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली. या मोहिमेला मदनपूर खादर परिसरात प्रचंड विरोध झाला. कायदेशीर बांधकामही बुलडोझर लावून पाडण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला. अमानतुल्ला हे मदनपूर खादर आंदोलनात सहभागी होते, ज्यामुळे गुरुवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी (Police) त्यांना ताब्यात घेतले.

Amanatullah Khan
आम आदमी पार्टी यंदा मुंबय महानगरपालिका निवडणूक लढवणार | AAP to contest BMC elections | Gomantak Tv

तसेच, अतिक्रमण विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून, दक्षिण दिल्ली (Delhi) महानगरपालिकेने (SDMC) मदनपूर खादर आणि धिरसेन भागात मोहीम राबवली होती. तर उत्तर दिल्ली महानगरपालिकेने (NDMC) रोहिणी आणि करोलबागमध्ये कारवाई केली होती.

दुसरीकडे, दिल्ली, उत्तर, दक्षिण आणि पूर्व या तिन्ही महापालिकांमध्ये सध्या भाजपचा (BJP) कब्जा आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. 20 एप्रिल रोजी जहांगीपुरी परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही मोहीम थांबवण्यात आली. या मोहिमेच्या काही दिवसांपूर्वी हनुमान जयंती मिरवणुकीत या भागात जातीय हिंसाचार झाला होता, हे विशेष.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.