Gujrat Election: AAPने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा 10 जणांची नावे

गुजरात निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीमध्ये जोरदार तयारी सुरु केली आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalDainik Gomantak

Gujarat Election: आम आदमी पार्टीने गुजरात निवडणूकीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 10 उमेदवारांची नावे आहेत. उमेदवारांमध्ये पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. भीमभाई चौधरी यांना देवदार, जगमल वाला यांना सोमनाथ, अर्जुन राठवा यांना छोटा उदयपूरमधून तिकीट मिळाले आहे. राजकोट दक्षिणमधून शिवलाल बारसिया, राजकोट ग्रामीणमधून वशराम सगठिया यांना तिकीट देण्यात आले आहे.

Arvind Kejriwal
Indian Coast Gard ने खोल समुद्रात फडकावला तिरंगा,Video Viral

गुजरात निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीमध्ये जोरदार तयारी सुरु केली आहे. यातच आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी गुजरातमध्ये पोहोचले आहेत. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केजरीवाल गुजरातमध्ये आपली ताकद वाढवू लागले आहेत.

Arvind Kejriwal
National Herald कार्यालयावर EDचा छापा, सोनिया अन् राहुल गांधींच्या चौकशीनंतर मोठी कारवाई

केजरीवाल म्हणाले की, 'आज मी तुम्हाला हमी देत ​​आहे की, मी जे सांगेन तेच करेन. 5 वर्षात दिलेला शब्द पाळला नाही तर मला हाकलून द्या. मी रोजगाराची हमी देऊन जात आहे.' यासोबतच केजरीवाल यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. आपली हमी सादर करताना अरविंद केजरीवाल यांनी प्रत्येक बेरोजगाराला 5 वर्षात जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत 3 हजार रुपये बेरोजगार भत्ता देऊ, 10 लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करुन देऊ. पेपरफुटीवर कठोर कायदे करु, असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, सहकार क्षेत्रातील नोकरी व्यवस्था सुरळीत करण्याचे आश्वासनही देखील केजरीवाल यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com