राज्यसभेच्या पाचही जागांवर आपचे उमेदवार विजयी

राज्यसभा निवडणुकीत आप सरकारचे पाचही उमेदवार बिनविरोध
Punjab Rajya Sabha
Punjab Rajya Sabhadainik gomantak

Punjab Rajya Sabha Election : काही दिवसांपुर्वीच लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांच्या निकालात पंजाबमध्ये आप ने घवघवीत यश संपादन केले आहे. त्या दणदणीत विजयानंतर आता पुन्हा एकदा आम आदमी पक्षाला यश मिळाले आहे. येथे राज्यसभेसाठी रिक्त असणाऱ्या पाच ही जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले असून ते पाचही उमेदवार बिनविरोध झाले आहेत. पंजाब राज्यसभेसाठी गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होता. मात्र या जागांसाठी कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार दिला नाही. (AAP elected five sits to the Rajya Sabha)

दिल्लीतील रोहिणी भागात भीषण आग

आम आदमी पक्षाने (AAP) या निवडणुकीत आमदार राघव चढ्ढा(Raghav Chadha), क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh), संदीप पाठक (Sandeep Pathak), संजीव अरोरा आणि अशोक मित्तल यांना राज्यसभा निवडणुकीत उतरवले होते. मात्र आज इतर कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार दिले नसल्याने 'आप'चे उमेदवार मतदान न करताच बिनविरोध विजयी झाले आहेत.

तर याबाबतची अधिकृत घोषणा ३१ मार्च रोजी होणार आहे. 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) आम आदमी पक्षाने 117 पैकी 92 जागा जिंकल्या होत्या. पंजाबमध्ये (Panjab) आम आदमी पक्षाच्या उमेदवारांच्या या विजयानंतर आता 'आप'चे 8 खासदार आहेत. ज्यामध्ये आम आदमी पार्टीचे दिल्लीतून आधीच 3 खासदार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com