सर्वेक्षणानुसार गोव्यासह उत्तर प्रदेशात भाजपचे पुनरागमन, पंजाबात आपची बल्लेबल्ले

उत्तराखंडमध्ये भाजपची (BJP) आघाडी अपेक्षित असली तरी काँग्रेस (Congress) येथे कडवी झुंज देऊ शकतो. तर मणिपूरमध्ये भाजपला 25-29 जागांवर भाजपला विजय मिळू शकतो.
सर्वेक्षणानुसार गोव्यासह उत्तर प्रदेशात भाजपचे पुनरागमन, पंजाबात आपची बल्लेबल्ले
2022 ला देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly elections) राजकीय पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत.Dainik Gomantak

पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 2022 ला देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly elections) राजकीय पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूरमध्ये पुढील वर्षीच्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. यापैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेस (Congress) सत्तेत आहे. पुढील निवडणुकीत कोणत्या राज्यात फेरबदल होणार किंवा कोणता पक्ष पुन्हा सत्तेत येणार याची माहिती एका सर्वेक्षणाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.

2022 ला देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly elections) राजकीय पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत.
Goa Election: 'गोव्यात भंडारी समाजाचा मुख्यमंत्री बनणार'!

या सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार बनू शकते. राज्यात विधानसभेच्या 403 जागा आहेत. सर्वेक्षणानुसार, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना राज्यात 213-221 जागा मिळू शकतात. दुसरीकडे, भाजप आघाडीला 41 टक्के मते मिळू शकतात. याशिवाय समाजवादी पक्ष (एसपी) आणि मित्रपक्षांना 152-160 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. मतांच्या टक्केवारीतही ते 31 टक्के मतांसह ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर बहुजन समाज पक्षाला (बसपा) 16-20 जागा (मताची टक्केवारी-15), काँग्रेसला 6-10 जागा (मताची टक्केवारी-9) आणि इतरांना 2-6 जागा (मताची टक्केवारी-4) मिळू शकतात.

गोव्यातही भाजपचे पुनरागमन

गोव्यातही भाजपचे पुनरागमन होताना दिसत आहे. राज्यात विधानसभेच्या 40 जागा आहेत. सर्वेक्षणानुसार, राज्यात भाजपला 19-23 जागा (मताची टक्केवारी-36) असू शकते. दुसरीकडे काँग्रेसला 2-6 जागा (मताची टक्केवारी-19) आणि आम आदमी पार्टीला 3-7 जागा (मताची टक्केवारी-24) मिळू शकतात. सर्वेक्षणात इतरांना 8-12 जागा मिळतील असा अंदाज आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसही राज्यात निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.

2022 ला देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly elections) राजकीय पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत.
Goa Election 2022: मुख्‍यमंत्र्यांसाठी निवडणूक प्रतिष्‍ठेची

पंजाबमध्ये भाजप गडगडणार, आप आणि काँग्रेसमध्ये चुरस

दुसरीकडे, पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. राज्यात विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत. सर्वेक्षणानुसार काँग्रेसला 42-50 (मताची टक्केवारी-35), शिरोमणी अकाली दल (एसएडी) 16-24 जागा (मताची टक्केवारी-21), आम आदमी पार्टीला 47-53 जागा (मताची टक्केवारी-36) मिळू शकतात. येथे भाजपची कामगिरी ढासळण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपला 0-1 आणि इतरांना 0-1 मिळण्याची अपेक्षा आहे.

सर्वेक्षणानुसार, उत्तराखंडमध्ये भाजपची आघाडी अपेक्षित असली तरी काँग्रेस येथे कडवी झुंज देऊ शकते. राज्यात 70 विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे भाजपला 36-40 जागांवर विजय मिळू शकतो (मताची टक्केवारी- 41). दुसरीकडे, काँग्रेसला 30-34 जागा (मताची टक्केवारी-36), आम आदमी पार्टीला 0-2 (मताची टक्केवारी-12) आणि इतरांना 0-1 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

तर मणिपूरमध्ये भाजपला 25-29 जागांवर भाजपला विजय मिळू शकतो (मताची टक्केवारी- 39). राज्यात विधानसभेच्या 60 जागा आहेत. अशा स्थितीत कोणताही पक्ष बहुमताचा आकडा पार करताना दिसत नाही. सर्वेक्षणानुसार, काँग्रेसला 20-24 जागा (मताची टक्केवारी-33), नागा पीपल्स फ्रंट (NPF) 4-8 जागा (मताची टक्केवारी-9) आणि इतरांना 3-7 (मताची टक्केवारी-19) जागा मिळू शकतात.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com