दिल्ली हिसांचार प्रकरणी आरोपी दीप सिध्दूला जामीन मंजूर

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

दिल्ली न्यायालयाने सिध्दूचा जामीन मंजूर केला आहे.

राजधानी दिल्लीमधील लाल किल्यावर धार्मिक झेंडा फडकावल्याप्रकरणी दीप सिध्दूला (Deep Sidhu) पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणामध्ये दिल्ली न्यायालयाने सिध्दूचा जामीन अखेर मंजूर केला आहे. दीप सिध्दूला तीस हाजार रुपायांच्या जातमुचल्याकवर जामीन देण्यात आला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने जामीन देताना काही अटी आणि शर्थीही त्याच्यासमोर ठेवल्या आहेत. त्याला त्याचा पासपोर्ट अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागणार आहे. त्याचबरोबर तो वापरत असलेल्या फोन नंबरची नोंद तपास अधिकाऱ्याकडे करावी लागणार आहे. तसेच फोनचं लोकेशन 24 तास ऑन ठेवण्याबरोबर फोन स्विच ऑफ करण्यास मनाई केली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि 15 तारखेला आपलं लोकेशन सांगण्याची अट त्याच्यासमोर ठेवण्यात आली आहे. (Accused Deep Sidhu granted bail in Delhi violence case)

8 एप्रिलला झालेल्या सुनावणीमध्ये दीप सिध्दूने आपण निर्दोष असल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर केला होता. तसेच त्याने जामीन मंजूर करण्याची न्यायालयासमोर विनंती केली होती. मला या प्रकरणामध्ये फसवलं जात असल्याचा त्याने आरोप केला होता. तर सरकारी पक्षाने जामीन अर्जाला विरोध करत दीप सिध्दू हा या प्रकरणामधील मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं होतं.

कुंभमेळा: मोदींच्या आवाहानाला स्वामी अवधेशानंद यांचे उत्तर

दरम्यान, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान 26 जानेवारी रोजी दिल्लीत हिंसाचार झाला होता. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढून धार्मिक झेंडा फडकावला होता. त्यानंतर दीप सिध्दूला अटक केली होती. 23 फेब्रुवारीला त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. 
 

संबंधित बातम्या