अभिनेते मिथून चक्रवर्ती करणार भाजपमध्ये एन्ट्री ?

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अचानक मिथून चक्रवर्ती यांच्या घरी जावून भेट घेतली आहे.

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेते मिथून चक्रवर्ती पुन्हा राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधान आलं आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अचानक मिथून चक्रवर्ती यांच्या घरी जावून भेट घेतली आहे. त्यामुळे बंगालच्या राजकारणात नवीन राजकीय समीकरणे तयार होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. भागवत आणि मिथून चक्रवर्ती याच्यांत जवळपास दीड तासांपेक्षा अधिक चर्चा झाली आहे. बंगालचं राजकिय वातावरण या भेटीमुळे चांगलंच तापलं. त्याचबरोबर मिथून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे.

 ममता बॅनर्जी देणार 5 रुपयांत जेवण

आगामी काळात बंगालमध्ये निवडणूका होणार आसल्य़ामुळे भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच झडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मिथून चक्रवर्ती यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकिय वर्तुळात वेगवेगळे कयास लावले जात आहेत. तर दुसरीकडे मिथून चक्रवर्ती यांनी भेटीवर भाष्य केले आहे, ''मोहन भागवत यांच्यबरोबरची भेट ही कौटुंबिक स्वरुपाची होती. खूप दिवस झाले आम्हांला भेटायचे होते. मात्र कार्यक्रमांमुळे आम्हाला भेटता येत नव्हते. भागवत यांनी आज माझ्या घरी नाष्टा केला आहे, आणि मला व माझ्या परिवाराला नागपूरलाही बोलवलं आहे'' असं मिथून चक्रवर्ती यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या