अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा भाजपमध्ये प्रवेश; म्हणाले..'मी कोब्रा आहे'

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

रविवारी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेळाव्यापूर्वी अभिनेता मिथुन चक्रवर्ती भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले.

कोलकाता : रविवारी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेळाव्यापूर्वी अभिनेते मिथुन चक्रवर्ती भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष दिलीप घोष आदींनी मिथुन चक्रवर्ती यांचे पक्षात स्वागत केले. घोष यांनी पक्षाचा झेंडा चक्रवर्ती यांच्याकडे सोपविला. यानंतर, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या मिथुन चक्रवर्तींनी सांगितले की, त्यांना नेहमीच वंचितांसाठी काम करण्याची इच्छा होती आणि भाजपाने त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना व्यासपीठ दिले आहे. बंगाली असल्याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

''तृणमुल कॉंग्रेस सत्तेत आल्यास पश्चिम बंगालचे काश्मीर होईल''

ते म्हणाले, "मला नेहमीच आयुष्यात काहीतरी मोठे करायचे होते, परंतु जगाच्या सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदींनी संबोधित करावे, अशा मोठ्या मेळाव्याचे भाग होण्याचे स्वप्न कधी पाहिले नव्हते. मला आमच्या समाजातील गरीब घटकांसाठी काम करण्याची इच्छा होती आणि ती इच्छा आता पूर्ण होईल.'' यावर समर्थकांनी जल्लोष केला. या प्रसंगी चक्रवर्ती यांनी त्यांच्या एका चित्रपटाचा संवादही सांगितला आणि ते म्हणाले, "अमी जोल्धोराव नो, बेले बोराव नोई ... अमी इकता कोबरा, एक चोबोल-ए चोबी (मला निरुपद्रवी साप मानण्याची चूक करू नका, मी एक कोब्रा आहे, मी एकाच वेळी लोकांना डंक मारू आणि ठार करू शकतो). विजयवर्गीय यांनी शनिवारी सायंकाळी चक्रवर्ती यांच्या निवासस्थानी बैठक घेतल्यानंतर या रॅलीत सहभागी होण्याची घोषणा केली होती. तृणमूल कॉंग्रेसचे राज्यसभेचे सदस्य राहिलेल्या मिथुन चक्रवर्तींनी  शारदा पोंझी घोटाळ्यात नाव आल्यानंतर 2016 मध्ये राज्य सभेचे सदस्यत्व सोडले.

''जोपर्यंत काळे कायदे रद्द होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांसोबत आंदोलन करु''

यासाठी प्रकृती ठीक नसल्याचे कारण त्यांनी नमूद केले होते. चक्रवर्ती यांनी मृणाल सेनच्या 1976 मध्ये आलेल्या 'मृगया' या चित्रपटात आदिवासी तिरंदाज म्हणून काम केले होते, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.चक्रवर्ती हे कोलकाता येथील प्रतिष्ठित स्कॉटिश चर्च कॉलेजचे विद्यार्थी आहेत. येथून सुभाषचंद्र बोस, नेपाळचे पहिले पंतप्रधान बीपी कोइराला आणि आसामचे पहिले मुख्यमंत्री गोपीनाथ बारडोलोई यांनीही शिक्षण पूर्ण केले होते. चक्रवर्ती हे एक राजकीयदृष्ट्या जागरूक अभिनेते म्हणून पाहिले जात असे आणि अनेकदा डाव्या विचारसरणीच्या दिग्दर्शकांनी त्यांना त्यांच्या चित्रपटात कास्ट केले होते. चक्रवर्ती यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य वाटले नाही. 
 

संबंधित बातम्या