Infosys, Accenture बरोबरच Capgemini देखील कर्मचाऱ्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा खर्च उचलणार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

देशात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर आता बर्‍याच कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा खर्च उचलण्याची योजना आखत आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर आता बर्‍याच कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा खर्च उचलण्याची योजना आखत आहेत. आता फ्रेंच आयटी कंपनी कॅपजेमिनीनेदेखील आपल्या  भारतातील कर्मचाऱ्यांचा कोरोना लसीकऱणाचा खर्च उचलणार आहे. कॅपजेमिनीचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन आर्दी म्हणाले की कंपनीच्या वैद्यकीय लाभ कार्यक्रमांतर्गत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा फायदा होईल. कंपनीने यासाठी वेलनेस पार्टनर्सशी हातमिळवणी केली आहे. 

फारुक अब्दुलांचा व्हिडिओ होतोय व्हयरल; जाणून घ्या

इन्फोसिस आणि अ‍ॅक्सेन्चरने​ही अशी घोषणा केली आहे

यापूर्वी आयटीतील बड्या कंपन्या इन्फोसिस आणि सॉफ्टवेअर कन्सल्टिंग फर्म अ‍ॅक्सेन्चरने कर्मचाऱ्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा खर्च उचलणार असल्याचे म्हटले आहे. भारतातील कर्मचाऱ्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा खर्च उचलण्यासाठी हेल्थ पार्टनर्सबरोबर डील होऊ शकते, का याचा विचार करणार असल्याचे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव म्हणाले होते. याशिवाय महिंद्रा ग्रुप आणि आयटीसी लिमिटेड कंपनीनेही आपल्या कर्मचार्‍यांसाठी कोरोना लस खरेदी करणार असल्याचे सांगितले होते.

18 वर्षे नव्हे तर मुलांचं पदवीपर्यंत करावे लागणार पालनपोषण: सर्वोच्च न्यायालय

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. लसीकरणात, 60 वर्षांपेक्षा जास्त व 45 ते 60 वर्षे वयोगटातील गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस दिले जात आहेत. लोक सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लस घेऊ शकतात. 1 मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. 

संबंधित बातम्या