मृत्यूनंतरही परवड थांबेना! रुग्णवाहिका मिळेना, कारच्या टपावरुन नेला मृतदेह

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 एप्रिल 2021

या त्रासासंदर्भातील एक फोटो सोशल मिडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Secnod Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. शिवाय कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाही. बऱ्याच ठिकाणी आरोग्यव्यवस्था कोलमडून पडल्याचं पहायला मिळत आहे. ऑक्सिजन बेड, औषधे आणि रुग्णवाहिकांची कमतरता जाणवू लागली आहे. यातच ता उत्तरप्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Affordability will not stop even after death The ambulance was not found the body was taken from the car)

उत्तरप्रदेशातील (Uttarpradesh) आग्रामधील बृजमध्येही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्याची संख्या इतक्या पटीने वाढत आहे की, अंत्यसंस्कार करण्यासाठी पाच ते सहा तास वाट पहावी लागत आहे. रुग्णवाहिकांची संख्या मर्यादीत असल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

भारत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या खरचं लपवत आहे का ?

या त्रासासंदर्भातील एक फोटो सोशल मिडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोरोनामुळे रुग्णवाहिकांची संख्या कमी असल्याने एका मुलाला मरण पावलेल्या आपल्या वडिलांची तिरडी गाडीवर बांधून त्यांचा मृतदेह स्मशानात घेऊन जावा लागला. हे विदारक वास्तव पाहून स्मशानभूमीतील अनेकांना अश्रू अनावर झाले. हा मुलगा आपल्या वडिलांची तिरडी घेऊन स्मशानात गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी काही तास थांबावं लागलं. अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत क्रमांक लावाला लागला. काही तासानंतर त्याचा नंबर आला  आणि त्याच्या वडिलांचं अखेर अंत्यसंस्कार करण्यात आलं. हे पाहून स्मशानभूमी जमा झालेल्या लोकांनाही अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. आग्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 600 हून अधिक झाली आहे. मागील 9 दिवसांमध्ये  कोरोनामुळे 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 

संबंधित बातम्या