Afghanistan Crisis: अजित डोवाल यांची रशियन सल्लागारासोबत महत्वाची बैठक

अफगाणिस्तान मुद्द्यावरून (Afghanistan Crisis) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालआणि रशियाचे एनएसए निकोलाई पत्रुशेव यांची 8 सप्टेंबर रोजी भेट होणार आहे.
Afghanistan Crisis: अजित डोवाल यांची रशियन सल्लागारासोबत महत्वाची बैठक
Afghanistan Crisis: Ajit Doval and Russia's NSA Nikolai Patrushev will meet tomorrowDainik Gomantak

अफगाणिस्तान मुद्द्यावरून (Afghanistan Crisis) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) आणि रशियाचे एनएसए (Russian NSA) निकोलाई पत्रुशेव (Nikolai Patrushev) यांची 8 सप्टेंबर रोजी भेट होणार आहे. या बैठकीत अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चर्चा होऊ शकते, असे मानले जाते. तालिबानने (Taliban) 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून सर्व देशांमध्ये गोंधळ उडाला आहे.(Afghanistan Crisis: Ajit Doval and Russia's NSA Nikolai Patrushev will meet tomorrow)

यापूर्वी भारतातील रशियाचे राजदूत निकोले कुडाशेव यांनी देखील अफगाणिस्तानबद्दल म्हटले होते की ही रशिया आणि भारतासाठी चिंतेची बाब आहे. राजदूताने दहशतवादाच्या पुनरुत्थानाबद्दल चिंता व्यक्त केली होती.

अलीकडेच तालिबानने दावा केला आहे की पंजशीर देखील ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, हे दावे खोटे आहेत असे सांगत फेटाळण्यात आले आहेत . आता तालिबान राजवट स्थापन करून अफगाणिस्तानात नवीन सरकार स्थापन केले जाऊ शकते. या संदर्भात, तालिबानने रशिया, चीन, पाकिस्तान, तुर्की, इराण आणि कतार या सहा देशांना आमंत्रणे देखील पाठवली आहेत. तालिबानच्या आमंत्रणात रशियाचे नाव समाविष्ट आहे, पण भारताचे नाव समाविष्ट नाही.

 Afghanistan Crisis: Ajit Doval and Russia's NSA Nikolai Patrushev will  meet tomorrow
Jammu Kashmir: माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत

अशा परिस्थितीत अजित डोभाल आणि निकोलाई पेट्रुशेव यांची उद्या होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे . दोन्ही देशांचे एनएसए एकत्र अफगाणिस्तानसाठी काय योजना आखतील हे पाहावे लागेल. कारण दोन्ही देशांच्या नागरिकांनाही तालिबानचा फटका बसला आहे.

यापूर्वी भारतातील रशियाचे राजदूत निकोले कुडाशेव यांनी अफगाणिस्तानात भारत आणि रशिया या दोन्ही देशांना सुरक्षा आणि अफगाण लोकांच्या गरजा पूर्ण करणारे सर्वसमावेशक सरकार हवे आहे.असे मत स्पष्ट केले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com