अफगाणिस्तान मुद्द्यावर मोदींची महत्वाची बैठक, अमित शाह यांचीही उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर एक महत्वाची बैठक घेतली आहे .
अफगाणिस्तान मुद्द्यावर मोदींची महत्वाची बैठक, अमित शाह यांचीही उपस्थिती
Afghanistan Crisis: Prime Minister Narendra Modi holds important meeting Dainik Gomantak

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने (Taliban) कब्जा मिळवल्यानंतर देशांतर्गतही अनेक घडामोडींना वेग आला आहे.परवाच कतारमधील भारताचे राजदूत (India’s ambassador to Qatar) दीपक मित्तल (Deepak Mittal) यांनी मंगळवारी दोहा (Doha) येथे तालिबानच्या (Taliban) राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास (Sher Mohammad Abbas Stanekzai) स्टँकझाई यांची भेट घेतली होती तर काल बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi ) अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर एक महत्वाची बैठक घेतली आहे . या विषयावर सुमारे तीन तास विचारमंथन झाले असून या बैठकीत गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) देखील उपस्थित होते. ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती कारण भारत तालिबानबाबत आपली भूमिका स्पष्ट करू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Afghanistan Crisis: Prime Minister Narendra Modi holds important meeting)

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत सुरक्षा आणि अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या लवकर परतण्याबाबत चर्चा झाली. अफगाण नागरिकांचा, विशेषत: अल्पसंख्यांकांचा ज्यांना भारतात यायचे आहे त्यांचा मुद्दाही बैठकीत आला असल्याचे बोलले जात आहे.

Afghanistan Crisis: Prime Minister Narendra Modi holds important meeting
भारत-तालिबानमध्ये पहिली अधिकृत बैठक, 'या' विषयांवर झाली चर्चा

तालिबान भारताच्या सर्व सूचनांकडे लक्ष देईल

दरम्यान परवा झालेल्या भेटीनंतर भारताचे राजदूत मित्तल यांनी भारताची भूमिका तालिबानसमोर ठेवली होती . या बैठकीत अफगाणिस्तानची भूमी भारतविरोधी कारवाया आणि दहशतवादासाठी कोणत्याही स्वरूपात वापरू नये अशे सांगण्यात आले होते दरम्यान तालिबान प्रतिनिधीने भारतीय राजदूताला आश्वासन दिले की भारताच्या सर्व चिंता दूर केल्या जातील.

तालिबान आणि भारताचे संबंध कसे असतील याबद्दल सट्टा बाजार गरम आहे. त्याचवेळी, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंटन यांनी म्हटले आहे की अमेरिका कतारची राजधानी दोहा येथून अफगाणिस्तानच्या कारभाराकडे लक्ष देईल आणि भारतही सध्या तेच करत असल्याचे दिसत आहे.

लवकरच नवीन तालिबानी सरकारची घोषणा

टोलो न्यूजनुसार, तालिबानचा दावा आहे की नवीन सरकारच्या स्थापनेशी संबंधित चर्चा अंतिम झाली आहे. लवकरच नवीन सरकारची घोषणा होऊ शकते. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य अनमुल्ला सामंगानी म्हणाले की हेबतोल्ला अखुंदजादा हे नवीन सरकारचे नेते असतील.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com