Shraddha Murder Case: श्रद्धाच्या हत्येप्रकरणी आफताबचा नवा खुलासा

श्रद्धा हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत.
Shraddha Murder Case
Shraddha Murder CaseDainik Gomantak

दिल्लीतील मेहरौली येथील श्रद्धा वालकर खून प्रकरण सध्या देशभर चर्चेचा विषय बनले आहे. क्रूरकर्मा आरोपी आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawala) याने मुंबईची श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हिची गळा आवळून हत्या केली. नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी नियोजनबद्ध कट रचला. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. ते फ्रिजमध्ये ठेवले. नंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. या हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. मात्र, या हत्याकांडाविषयी दिल्ली पोलिसांकडे ठोस पुरावे असल्याचे दिसत नाही.श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताबची सोमवारपर्यंत नार्को टेस्ट होऊ शकते. आता आरोपी आफताबने दिल्ली पोलिसांसमोर आणखी एक खुलासा केला आहे.

आफताब कडून श्रद्धाच्या हत्याकांडाविषयी गुपित उघाड करण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी आफताबलाही मेहरौलीच्या जंगलात नेले होते. त्याच्या घरातून धारदार शस्त्रही जप्त करण्यात आले असून या शस्त्राने श्रद्धाची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी जंगलातून 17 हाडेही जप्त केली आहेत.

Shraddha Murder Case
Kolkata Murder Case: श्रद्धासारखेच हत्या प्रकरण, आईच्या सांगण्यावरुन मुलाने केले वडिलांचे 6 तुकडे

दिल्ली पोलीस आफताबची सतत चौकशी करत आहेत. चौकशी दरम्यान आफताबने हत्येनंतर श्रद्धाचे डोके मैदान गढीच्या विशाल तलावात फेकल्याचे पोलिसांना सांगितले. श्रद्धाच्या डोक्याचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मैदान गढीच्या विशाल तलावात शोध मोहीम हाती घेतली आहे. मैदान गढी येथील तलाव रिकामा करण्यासाठी रविवारी महापालिकेचे अनेक कर्मचाऱ्यांनी मोठे टँकर घेऊन कामाला सुरुवात केली. मात्र काही एकरांवर पसरलेला हा तलाव रिकामा करण्यास आता ग्रामस्थांनी मात्र विरोध केलाय .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com