Iran ऐवजी नामिबियातून का आणण्यात आले चित्ते; वाचा संपूर्ण प्रकरण

Cheetahs: पंतप्रधानांनी बटण दाबून पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले.
Cheetahs
CheetahsTwitter / @ANI

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो नॅशनल पार्कमध्ये 8 चित्ते सोडून चित्ता प्रकल्पाचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी बटण दाबून पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले.

दरम्यान, 70 वर्षांनंतर चित्ता (Cheetahs) देशात परतला आहे. हे चित्ते नामिबियातून भारतात आणण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो नॅशनल पार्कला त्यांचे नवीन घर बनवण्यात आले आहे. भारतात आणलेल्या चित्तांमध्ये पाच मादी आणि एक नर आहे. चित्ता भारतात आणण्यासाठी यापूर्वी इराणशी चर्चा झाली होती, मात्र काही अटींमुळे करार होऊ शकला नाही.

वास्तविक, हे प्रकरण 1970 च्या दशकातील आहे, जेव्हा भारत सरकारने पहिल्यांदाच चित्ते नष्ट झाल्यानंतर त्यांना इराणमधून (Iran) आणण्याचा विचार केला होता. इराणी चित्यांची आनुवंशिकता आफ्रिकन चित्तांसारखीच मानली जाते. इराणने कराराला मान्यता दिली मात्र भारतासमोर एक अट ठेवली. इराणने चित्यांच्या बदल्यात भारतीय सिंह मागितले होते, त्यामुळे भारताने आपला निर्णय बदलला.

Cheetahs
Project Cheetah: PM मोदींनी वाढदिवसानिमित्त देशाला दिली 'ही' मोठी भेट

दुसरीकडे, इराणच्या नकारानंतरही भारतीय शास्त्रज्ञांनी हार मानली नाही. सन 2000 मध्ये, हैदराबादच्या शास्त्रज्ञांनी असा प्रस्ताव दिला की, जर आपल्याला चित्ताच्या काही पेशी आणि टीश्यू मिळाल्या तर आपण त्याचे क्लोन करुन चित्ता बनवू. मात्र इराणने यालाही नकार दिला. नंतर 2009 मध्ये चित्ता भारतात आणण्याची कसरत पुन्हा सुरु झाली. त्यावेळी भारत (India) सरकारने आफ्रिकन चित्त्याच्या भारतातील सर्व्हाइलवर एक स्टडी केला होता. जिथे समितीने कुनो नॅशनल पार्क हे चित्यासाठी पोषक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सरकारने चित्तांसाठी नामिबियाशी संपर्क साधला.

मिळालेल्या माहितीनुसार, नामिबियाशिवाय केनियामधून चित्ता भारतात आणण्याबाबत चर्चा झाली होती, परंतु नामिबियातील चित्ता फाऊंडेशनने चित्ता केअर प्रोटेक्शनवर बरेच काम केले आहे. त्यामुळेच भारत नामिबियातून चित्ते आणण्याचा बराच काळ प्रयत्न करत होता. चर्चेनंतर, शेवटी नामिबियाशी करार झाला.

Cheetahs
PM मोदींनी पोप फ्रान्सिस यांची घेतली भेट; भारतभेटीचे दिले निमंत्रण

तसेच, 2010 मध्ये तत्कालीन वनमंत्री जयराम रमेश चित्ता पाहण्यासाठी नामिबियाला गेले होते. 2011 मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चीत्ता प्रोजेक्टसाठी 50 कोटी रुपये जारी केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, चित्त्यांच्या देखभालीसाठी वर्षाला 300 कोटी रुपयांचे बजेट मांडण्यात आले होते. मात्र काही संघटनांनी आक्षेप घेत या प्रकल्पाला न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिली. 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारला चित्ता आणण्याऐवजी गुजरातमधील गीरमधून सिंहांचे स्थलांतर करण्यास सांगितले होते.

त्यानंतर, 2019 मध्ये केंद्र सरकारने तज्ज्ञ समितीच्या अहवालाचा हवाला दिला, त्यानंतर न्यायालयाने प्रोजेक्ट चीत्तावरील बंदी उठवली. आणि भारत सरकारने पुन्हा एकदा प्रोजेक्ट चित्ताचे काम सुरु केले. आज तीन वर्षांनंतर 17 सप्टेंबर 2022 रोजी 8 चित्ते विमानाने भारतात आणण्यात आले, ज्यांना PM मोदींनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले.

Cheetahs
SCO President: PM मोदींनी प्रथमच घेतली इराणच्या अध्यक्ष्यांची भेट, या मुद्द्यांवर झाली चर्चा

तज्ज्ञांच्या मते, कुनो नॅशनल पार्कला चित्त्यांसाठी उत्तम जागा मानण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, येथील जंगलात माणसांची लोकसंख्या खूपच कमी आहे. दरोडेखोरांच्या भीतीमुळे येथील लोक स्थलांतरीत झाले आहेत. यासोबतच सुमारे 200 सांबर, चितळ आदी प्राणी येथे आणण्यात आले आहेत.

त्याच वेळी, जेव्हा एखादा जीव इकोलॉजी साखळीतून नामशेष होतो, तेव्हा इतर जीव त्याची जागा घेतात, ज्यामुळे इकोसिस्टम सुरुळीत सुरु राहते. जंगली कुत्रे आणि लांडगे यांनी चित्त्यांची जागा घेतली होती, परंतु जेव्हा चित्ता पुन्हा सोडला जातो तेव्हा संघर्ष उद्भवू शकतो. आशियाई चित्ता आता फक्त इराणमध्येच आढळतात. एशियाटिक चित्ता हा धोक्यात असलेल्या प्रजातींपैकी एक मानला जातो. हे इराणच्या विस्तीर्ण मध्य वाळवंटात आढळतात. 2015 पर्यंत इराणमध्ये फक्त 20 चित्ते होते, सध्या मिळालेल्या माहितीनुसार, एशियाटिक चित्त्यांची एकूण संख्या सुमारे 40 ते 70 आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com