Jammu And Kashmir: कलम 370 रद्द केल्यापासून आतापर्यंत 118 नागरिकांचा मृत्यू

Jammu And Kashmir News: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत दहशतवादाच्या घटनांमध्ये घट झाल्याचे केंद्र सरकारने बुधवारी संसदेत सांगितले.
Jammu And Kashmir
Jammu And KashmirDainik Gomantak

Central Govt: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत दहशतवादाच्या घटनांमध्ये घट झाल्याचे केंद्र सरकारने बुधवारी संसदेत सांगितले. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितले की, 'कलम 370 रद्द केल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत 118 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 5 काश्मिरी पंडित होते. याशिवाय हिंदू आणि शीख समुदायातील इतर 16 लोक होते.'

राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी असेही सांगितले की, ''5502 काश्मिरी पंडितांना जम्मू-काश्मीर (Jammu And Kashmir) सरकारच्या विविध विभागांमध्ये सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. ऑगस्ट 2019 नंतर एकाही काश्मिरी पंडिताने खोऱ्यातून स्थलांतर केलेले नाही.''

Jammu And Kashmir
Jammu And Kashmir: ग्रेनेड स्फोटात लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू, अनेक सैनिक जखमी

ते पुढे म्हणाले, "दहशतवादाबाबत (Terrorism) सरकारचे धोरण पूर्णपणे बदलले आहे. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. दहशतवादी हल्ल्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, जी 2018 मधील 417 वरुन 2021 मध्ये 229 वर आली आहे.''

राय पुढे असेही म्हणाले की, '5 ऑगस्ट 2019 ते 9 जुलै 2022 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून 128 सुरक्षा दलांचे जवान मारले गेले. तर 118 नागरिकांचा (Citizens) मृत्यू झाला आहे. मारल्या गेलेल्या 118 नागरिकांपैकी 5 काश्मिरी पंडित होते तर इतर 16 हिंदू आणि शीख समुदायाचे होते. या काळात एकाही यात्रेकरुचा मृत्यू झालेला नाही.'

Jammu And Kashmir
Jammu and Kashmir: पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा CRPF तुकडीवर हल्ला, चकमकीत जवान शहीद

दुसरीकडे, ऑगस्ट 2019 नंतर देशाच्या इतर भागात राहणार्‍या किती काश्मिरी पंडितांचे खोर्‍यात पुनर्वसन करण्यात आले, असे विचारले असता केंद्रीय मंत्री म्हणाले की, 'पंतप्रधान विकास पॅकेज (PMDP) अंतर्गत 5,502 काश्मिरी पंडितांना खोऱ्यातील जम्मू-काश्मीर सरकारच्या विविध विभागांमध्ये सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.' तर दुसर्‍या प्रश्नाला उत्तर देताना राय म्हणाले की, 'गेल्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर हल्ल्याच्या दोन घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा जखमी झाला आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com