ब्लॅक फंगस नंतर आता 'व्हाइट फंगस' चे नवे संकट

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 21 मे 2021

देशात कोरोना आणि म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) सारखे आजारांचे संकट असतांना व्हाइट फंगस (white fungus) हा नवीन आजार समोर आल्याने लोकांमध्ये चिंतेच वातावरण तयार झालं आहे.

white fungus: देशात कोरोना विषाणूचा (Corona virus) संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून  त्यात आता नवीन विषाणू म्हणजेच म्युकोरमायकोसिस हा गंभीर आजार समोर आला आहे. त्यातच आता व्हाइट फंगस (white fungus) नावाच्या नवीन विषाणूने डोकेवर काढले आहे. हा आजार काळी बुरशीहूनही (Mucormycosis) प्रचंड गंभीर असल्याचे बोलल जात आहे. नुकतेच बिहारमध्ये व्हाइट फंगस (white fungus) या आजारचे चार नवीन रुग्ण (Patient) सापडले आहेत. या रुग्णांना पटना मेडिकल  कॉलेजमध्ये (PMCH) उपचारांसाठी दाखल केले आहे. देशात कोरोनासह  आणि म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) सारखे आजारांचे संकट असतांना व्हाइट फंगस (white fungus) हा नवीन आजार समोर आला आहे. यामुळे लोकांमध्ये चिंतेच वातावरण तयार झालं आहे. 'व्हाइट फंगस' नेमकी लक्षणे कोणती ते जाणून घेऊया. (After the black fungus, now the 'white fungus' is a new crisis)

Black Fungus: राजस्थानात महामारी म्हणून घोषित 

व्हाइट फंगस हा ब्लॅक फंगसपेक्षा जास्त भेणक आहे. त्याचा परिणाम  त्वचा , पोट, आणि  फुफ्फुस यासारख्या अवयवांवर होत आहे. देशात सध्या बिहारमध्ये या आजारचे रुग्ण सापडले आहे. इतर राज्यांमध्ये या आजारचे लक्षण असलेला रुग्ण  आढळलेला नाही अशी माहिती दिली आहे. याची लक्षणे कोणती आहेत ते आता पाहूया. 

Goa Black Fungus: गोव्यात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; आणखी 6 जणांना लागण 

व्हाइट फंगसची कोणती लक्षणे आहेत -

- कोरोना विषाणूसारखेच या आजारचे लक्षण आहे. मात्र, रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येते. त्यामुळे त्या व्यक्तीला  व्हाइट फंगस या आजाराची लागण झाल्याची शक्यता असते.

- या आजाराची लागण झाल्यास HRCT स्कॅन करणं  आवश्यक आहे.

- शरीराची रोगप्रतिकरक शक्ती कमी होते. 

-ऑक्सिजन पातळी कमी होते.  

- कोरोनाप्रमानेच गंभीर आहे व्हाइट फंगस विषाणू. 

डॉक्टरांच्या मते,  व्हाइट फंगस विषाणू कोरोनाप्रमानेच गंभीर आहे. परंतु या विषाणूमुळे कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. तरीसुद्धा आपण सर्वानी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.  

 

 

संबंधित बातम्या