ट्विटरने गृह मंत्री अमित शाहांचा प्रोफाईल फोटो काढला; पुन्हा रिस्टोर करत म्हटले चूक झाली

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

ट्विटर काही दिवसांपासून भारतात अनेक विवादात सापडलं आहे. आता केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा प्रोफाईल फोटो हटवण्याची चूक ट्विटरने केली आहे.

नवी दिल्ली- मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर काही दिवसांपासून भारतात अनेक विवादात सापडलं आहे. आता केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा प्रोफाईल फोटो हटवण्याची चूक ट्विटरने केली आहे. त्यावर सफाई देताना त्यांनी शाह यांचा फोटो एका बग मुळे तेथे दिसत नव्हता, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीही अशीच चूक करताना ट्विटरने लेह आणि चीनला काश्मिरला चीनच्या भूभागावर दाखवले होते.   

गृह मंत्र्यांच्या फोटो हटवण्याच्या प्रकरणावर ट्विटरच्या प्रवक्त्याने म्हटले की, 'आमच्या ग्लोबल कॉपीराईट पॉलिसीनुसार चुकून हे घडलं होतं. त्यामुळे हा प्रोफाईल फोटो लॉक झाला होता. आम्ही ही सुधारत पुन्हा प्रोफाईल फोटो रिस्टोर केला आहे.   

काय आहे प्रकरण?

  सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर गुरूवारी काही वेळासाठी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या ट्विटर अकाउंटवर त्यांचा प्रोफाईल फोटो दिसत नव्हता. यानंतर लोकांनी त्याचे स्क्रीन शॉट शेअर करायला सुरूवात केली. प्रोफाईल फोटोच्या जागी ट्विटरची एक नोटीस लिहिलेली होती. ज्यात कॉपीराईटच्या कायद्यानुसार प्रोफाईल फोटोला हटवण्याचा मजकूर लिहिलेला होता. 

संबंधित बातम्या