कोरोनानंतर दिल्लीत ‘ब्लॅक फंगस’ च सावट

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 7 मे 2021

कोरोनामुळे ‘म्युकोरमायरिस’ प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिल्लीमध्ये (Delhi) कोरोनाचा हाहाकार असताना आता 'ब्लॅक फंगस' (black fungus) चं सावट दिल्लीकरांवर घोंगावत आहे. कोरोनामुळे ‘म्युकोरमायसिस’ (Mucormycosis) प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या आजारामुळे डोळे, गळा, आणि नाक यांना इजा पोहचण्याची शक्यता आहे. म्यूकोरमायसिस एक कोरोनामुळे उद्भणारं फंगस आहे. (After Corona only black fungus spread in Delhi)

आम्हाला कोरोनानंतर होणाऱ्या फंगस संक्रमणात वाढ होताना दिसत आहे.  मागील दोन दिवसात म्यूकोरमायसिस पिडित सहा रुग्णांची भरती झाली आहे. गेल्या वर्षी या संक्रमणामुळे मृत्यू दरही अधिक होता. यामुळे दिल्लीतील अनेक लोकांना अंधत्व आलं होतं. त्याचबरोबर नाक आणि गळ्याचं हाड गळून गेलं होतं, असं गंगाराम रुग्णालयामधील वरिष्ठ ईएनटी सर्जन डॉक्टर मनिष मंजुला (Doctor Manisha Manjula) यांनी सांगितलं आहे.

''नव्या संसदेसाठी, पुतळ्यांसाठी पैसे आहेत मग लसीकरणासाठी नाहीत का?...

डायबेटीस (Diabetes) असलेल्या कोरोना रुग्णांवर स्टेराईडचा (Steroid) उपयोग काळजीपूर्वक करावा लागतो. कारण त्यामुळे ब्लॅक फंगस होण्याची शक्यत आहे, असं ईएनटी विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरुप (Doctor Ajay Swarup) यांनी सांगितलं. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसची लक्षणे दिसू येत आहेत. खासकरुन मधुमेह, किडनी, ह्रयदरोग आणि कर्करोगासारखे आजारांनी पिडित लोकांमध्ये ही समस्या अधिक आहे.

भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर दररोज रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठत आहेत. देशात सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण आढळले. गेल्या चोवीस तासात देशामध्ये 4 लाख 14 हजार 188 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक काळजीचा विषय ठरत असताना सलग 11 व्या दिवशी तीन हजाराहून अधिक कोरोना बळींची संख्या झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.
 

संबंधित बातम्या