Oxfam: दिल्लीतील थिंकटँकनंतर आता आयटी विभागाची ऑक्सफॅमवर छापेमारी

Oxfam Organization: दिल्लीस्थित थिंकटँक सेंटर ऑफ पॉलिसी रिसर्चनंतर आता आयकर विभागाने ऑक्सफॅम या स्वयंसेवी संस्थेवर छापा टाकला आहे.
Oxfam
OxfamDainik Gomantak

Oxfam Organization: दिल्लीस्थित थिंकटँक सेंटर ऑफ पॉलिसी रिसर्चनंतर आता आयकर विभागाने ऑक्सफॅम या स्वयंसेवी संस्थेवर छापा टाकला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, आज सेंटर ऑफ पॉलिसी रिसर्चवरही आयटी विभागाने छापा टाकला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सीपीआरवरील ही कारवाई हरियाणा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांशी संबंधित आहे. प्राप्तिकर विभागाने '20 हून अधिक नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांच्या निधी' संदर्भात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.

दरम्यान, या केंद्राचे प्रमुख प्रतापभानू मेहता (Pratap Bhanu Mehta) हे भाजप (BJP) सरकारचे टीकाकार आणि ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ देखील आहेत. सध्या सीपीआरच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी गोपीनाथ आहेत. राजकीय तज्ञ गोपीनाथ जवाहरलाल नेहरु विद्यापीठात अध्यापन करायच्या. नवी दिल्लीतील (Delhi) लेडी श्रीराम कॉलेजच्या प्राचार्यही त्या राहिल्या आहेत. यामिनी अय्यर या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. बोर्डाच्या सदस्यांमध्ये माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन आणि आयआयएमचे प्राध्यापक रामा विजापूरकर यांचा समावेश आहे.

Oxfam
उद्योगपती गौतम अदानींचा USIBC ग्लोबल लीडरशिप अवॉर्डने सन्मान

दुसरीकडे, निधीबाबत, थिंकटँकने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, 'भारत सरकारकडून कोणत्याही स्वरुपाचा लाभ संस्थेला मिळत नाही. त्यामुळे योगदान देणे शक्य आहे. CPR ला विविध देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्त्रोतांकडून अनुदान प्राप्त होते, ज्यात फाउंडेशन, कॉर्पोरेट, सरकार आणि बहुपक्षीय एजन्सीचा समावेश आहे.'

Oxfam
उद्योगपती गौतम अदानी देशाचे नवे 'सिमेंट किंग'

तसेच, ऑक्सफॅम या स्वयंसेवी संस्थेची स्थापना 1973 मध्ये झाली आहे. उच्च दर्जाची शिष्यवृत्ती, उत्तम धोरणे आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणार्‍या समस्यांबद्दल जाणून घेणे, यासाठी ही संस्था काम करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com