डीएमकेच्या विजयानंतर महिलेनं जीभ कापून नवस केला पूर्ण

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 3 मे 2021

द्रमुकला मिळालेल्या विजयानंतर एका महिलेनं आपली जीभ कापून देवाला वाहिली असल्याची घटना समोर आली आहे.

गेली दहा वर्ष सत्तेत असणाऱ्या अण्णा द्रमुक पक्षाचा (Anna Dramuk) पराभव करत तामिळनाडूत डीएमकेनं (DMK) सत्ता हस्तगत केली आहे. तामिळनाडूमधील जेष्ठ नेते करुणानिधी (Karunanidhi) आणि जयललिता (Jayalalitha) यांच्या पश्चात झालेल्या पहिल्याच निवडणूकीत द्रमुक आणि त्यांच्या मित्रपक्षांनी स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. दरम्यान द्रमुकला मिळालेल्या विजयानंतर एका महिलेनं आपली जीभ कापून देवाला वाहिली असल्याची घटना समोर आली आहे. (After DMKs victory the woman cut her tongue and made a vow)

वनिता यांनी 2021 विधानसभा निवडणूकीत द्रमुकला विजय मिळाला तर आपली जीभ देवाला अर्पण करण्याचा नवस केला होता. द्रमुकला विजय मिळाल्यानंतर वनिता मंदिरात पोहचल्या आणि जीभ कापून देवाला अर्पण करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोरोनाच्या पाश्वभूमीवर धार्मिक स्थळांवरही निर्बंध आहेत. वनिता यांनी मंदिराच्या गेटवरच आपली कापलेली जीभ ठेवली आणि काही वेळातच त्या जमिनीवर कोसळल्या. त्यानंतर वनिता यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

'4M' आहेत ममता बॅनर्जी यांच्या विजयाचे रहस्य 

234 सदस्यीय विधानसभेत द्रमुकला 135 जागा मिळाल्या आहेत. डावे पक्ष आघाडीतील मित्र पक्षांना मिळालेल्या जागांवरुन द्रमुक आघाडीतील 154 जागांवर विजय प्राप्त केला आहे. द्रमुक नेते स्टॅलिन हे लवकरच मुख्यमंत्रीपद स्वीकारतील, असं द्रमुकच्या गोटातून सांगण्यात येत होते.

गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या जयललिता यांच्या निधनानंतर करिष्मा असलेला चेहरा नसतानाही अण्णा द्रमुक पक्षाने 70 जागा मिळवल्या आहेत. मात्र आण्णा द्रमुकबरोबर युती करणाऱ्या भाजपने तामिळनाडूमध्ये हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला पण त्यांना आपेक्षित यश मिळवता आलं नाही. भाजपला चारच जागा मिळवता आल्या.
 

संबंधित बातम्या