नरेंद्र मोदींची निवड करून देशाची पाच वर्षे अंधकारात लोटली

narendra modi.jpg
narendra modi.jpg

नवी दिल्ली : भारतीय मतदारांनी देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची निवड करून पाच वर्षे अंधकारात लोटली आहेत.  मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतर भारताचा आत्मा एका गडद काळोखात लोटला गेलाय.  हे दोन्ही मथळे आहेत काही परदेशी वृत्तपत्रांचे. भारतीय मतदारांनी दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांची बहुमतानं देशाच्या पंतप्रधानपदी निवड केली.  त्यावेळी काही परदेशी वृत्तपत्रांनी नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे अशा शब्दात वर्णन केले होतं. त्यानंतर आज दोन वर्षांनंतर परदेशी माध्यमांनी पुन्हा एकदा भारतातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी भारत सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचं, परदेशी मध्यमांनी म्हटले आहे. तथापि, नुकतेच एका परदेश वृत्तपत्राने आपल्या संपादकीय लेखात भारतातील मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.  (After electing Narendra Modi, five years went by in darkness) 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णायामुळे भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मोदी यांच्या अतिविश्वासामुळे भारतात जीवघेणा कोरोना विक्रमी स्तरावर पसरला आहे. एका परदेशी वर्तमानपत्रानं 23 एप्रिल रोजी भारतातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं होतं. लोक आता अत्यंत वाईट परिस्थितीत जगत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेड मिळेनासे झालेत. भारतातील 1%  लसीकरणही झाले नव्हते तेव्हा 6 आठवड्यांपूर्वी त्यांनी भारताला 'वर्ल्ड फार्मसी' म्हणून घोषित केले आहे. 

वाचा, काय म्हटले आहे परदेशी वृत्तपत्रांमध्ये  

- भारतात दररोज 3.5 लाख नवीन कोरोना रुग्ण आणि 2000 हून अधिक मृत्यू होत आहेत. कोरोनाच्या भयावह विषाणूमुळे  भारतात ही परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु भारतात अशी परिस्थिती होण्यामागे भारतीय पंतप्रधानांचा अहंकार, बढाया मारणे आणि  नियोजनाचा अभाव या गोष्टी देखील जबाबदार आहेत. 

- आधी जगभरात लसीची निर्यात करण्याचे ढोल वाजवले. मात्र तीन महिन्यांनंतर, भारतातच एक भयावह परिस्थिती निर्माण झाली. 

- भारतातील परिस्थिती नियंत्रणात नाही. भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीची आवश्यकता आहे. 2020 मध्ये अचानक लॉकडाऊन लावण्यात आला. लाखों प्रवासी कामगार स्थलांतरीत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी  लॉकडाऊन करत देशातील सर्व व्यवस्था काही क्षणात बंद केली, मात्र 2021 च्या सुरुवातीला सर्वांना मोकळे सोडले. 

2023 पर्यंतही समूह रोगप्रतिकरशक्ती (हर्ड इम्युनिटी)  शक्य नाही 
- नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय यंत्रणेवर केवळ भाषणे दिली. देशातील नागरिकांचे रक्षण करण्याऐवजी अनावश्यक उत्सव साजरे करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी परिस्थिती आणखी बिकट केली. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी अनेक मोर्चे, प्रचारसभा घेण्यात आल्या. त्याठिकाणी त्यांनी कोणीही मास्क न लावलेल्या हजारो लोकांच्या जमावाला संबोधित केले. इतकेच नव्हे तर कुंभमेळ्यालाही परवानगी देण्यात आली. कोट्यवधी लोकांच्या कुंभमेळयाला परवानगी दिली. जे पुढे कोरोनाचा हॉटस्पॉट बनले. 

- पंतप्रधान मोदींचे देशातील सर्वांना लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे, परंतु त्यांना देशाच्या उत्पादन क्षमतेची सत्यता माहित नाही. जिथे राजकीय लाभ मिळतो त्या ठिकाणी  लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले,  मात्र ज्या राज्यांना सर्वात जास्त लसीकरणाची गरज आहे त्या ठिकाणी नाही, याचा परिणाम म्हणजे आतापर्यंत केवळ 10% लोकांनाच लस मिळाली आहे. याचा अर्थ असा होतो की,   हर्ड इम्युनिटी मिळवण्यासाठी आवश्यक लसीकरण 2023 पर्यंतही पूर्ण होऊ शकत नाही.

तथापि, अमेरिका, युरोप, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन यांनी या लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी सहाय्य जाहीर केले आहे. त्यामुळे या संकटात आता पुन्हा एकदा एकजुटीने एकत्र येण्याची वेळ आली आहे. अशा भयावह परिस्थितीत पुन्हा एकदा भारताच्या दारिद्र्यरेषेखाली आलेल्या कोट्यावधी लोकांचे दुःख कमी करण्यासाठी, शक्य ते सर्व करणे गरजेचे आहे. 


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com