
Tamil Nadu Fores Fire: तामिळनाडूमधील दिंडीगुल जिल्ह्यातील कोडाईकनाल टेकड्यांजवळ जंगलाला आग लागली आहे. एएनआयने या आगीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आग वाढतांना दिसत आहे.
वणवा कसा लागतो
उन्हाळ्यात (Summer) वणवा लागण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी प्राणी, त्यांची अंडी, घरटी जळून खाक होत असून, अंडी व घरटी जळाल्याने अनेक पक्षी त्या आगीत प्राणाची आहुती देतात.
याबाबत जनजागृती चळवळ उभारण्याची गरज आहे. हे वणवे पावसाळ्यात गवत चांगले यावे, म्हणून लावले जातात. काही जण सहज जाताजाता विडी, सिगारेट पेटवून टाकतात. त्यामुळे आगी लागतात. काही जण केवळ हौस म्हणून आग लावतात, तर काही जण शेतातील पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावतात. तीच आग आटोक्यात न आल्यास इतर ठिकाणी आगी लागतात. वनातील अथवा वनालगतच्या शेतातील झाडांवर असणारे मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठीही आग लावली जाते.
या गोष्टी टाळाव्यात
जंगलात स्वयंपाकासाठी अथवा शेकोटीसाठी विस्तव पेटवून तसाच जळत ठेवू नये.
जंगलात बिडी, सिगारेट ओढून त्याची थोटके इतरत्र फेकू नये.
जंगलातील किंवा त्याच्या शेतातील वनोपज गोळा करण्यासाठी त्या झाडाखालील पालापाचोळा जाळू नये.
रात्री जंगलातुन जाताना बॅटरी घेऊन जावे.
मोठमोठ्या जंगलात आग निरीक्षण मनोरा उभारणे.
रस्त्याच्या दुतर्फा सहा मीटरची जाळरेषा काढणे, जाळरेषेवर पडलेला पालापाचोळा वारंवार झाडणे.
आगीचा धूर दिसताच याबाबत जवळच्या वनाधिकाऱ्यांना अथवा कर्मचाऱ्यांना याची
माहिती देणे.
आगीचा परिणाम काय होतो
गवत, पालापाचोळा जळून राख झाल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात.
वनस्पती पुनर्निर्मितीला बाधा येते.
चारा मिळेनासा होऊन जनावरे त्यासाठी भटकतात.
ती अशक्त बनतात. दुभती जनावरे भाकड होतात.
वनात पडलेली व वाळलेली झाडेझुडपे जळतात.
वारंवार लागणाऱ्या आगींमुळे उघड्या पडलेल्या जमिनीवर पावसाचे पाणी थेट वेगाने पडते.
जमिनीची सुपीकता कमी होते.
जमिनीची धूप होऊन पाणी धारण करण्याची क्षमता नष्ट होते.
भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते. विहिरी, तळी वेळेपूर्वीच आटू लागतात.
कीडभक्षी, पक्ष्यांची घरटी, अंडी, पिले जळून खाक होतात.
विविध फळझाडे, बहुगुणी वनौषधी जळून खाक होतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.