Corona Update : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रानंतर आता पंजाब सरकारने घेतला मोठा निर्णय 

Corona Update : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रानंतर आता पंजाब सरकारने घेतला मोठा निर्णय 
Punjab

देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा जोमाने पाय पसरण्यास  सुरवात केल्याचे मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र, पंजाब, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दिल्ली यांसारख्या राज्यांमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणे पूर्वीपेक्षा अधिक सापडत असल्याचे चित्र पाहायला पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने 30 एप्रिलपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. हा नाईट कर्फ्यू पंजाब मधील सर्व जिल्ह्यांमध्ये  लागू राहणार आहे. (After Maharashtra now the Punjab government has taken a big decision on Corona problem)

महाराष्ट्र राज्यानंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पंजाब मध्ये आढळत आहेत. त्यामुळे पंजाब राज्यात कोरोनाच्या वाढत्या खबरदारीसाठी म्हणून सरकारने नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर्फ्यू सकाळी 9 वाजता सुरू होईल आणि पहाटे 5 पर्यंत लागू राहील. यापूर्वी पंजाब मधील 12 जिल्ह्यांमध्ये 10 एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला होता. आज पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात कोरोना प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याआधीच जनतेने कोरोनाची खबरदारी घेतली नाही तर 8 एप्रिलपासून कठोर निर्बंध लादणार असल्याचे सांगितले होते.   

याशिवाय, पंजाब सरकारने राजकीय कार्यक्रमांवर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जास्तीत जास्त 100 जणांना आऊटडोर कार्यक्रमामध्ये आणि इनडोअर कार्यक्रमात 50 जणांना सहभागी होता येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यापूर्वी पंजाब मध्ये वाढत चाललेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे केंद्र सरकारने देखील चिंता व्यक्त केली होती. आरोग्य मंत्रालयाने पंजाब मधील 80 टक्के प्रकरणे ही यूके व्हेरिएन्टची असल्याचे म्हटले होते. 

दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे नाईट कर्फ्यू लावण्याचा आदेश उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता. तर मागील चोवीस तासात पंजाब (Punjab) मध्ये 2,900 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 62 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 25,913 वर पोचली आहे. याशिवाय, मागील काही दिवसात राज्यात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत 7,216 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, राज्यात आतापर्यंत 25 लाखाहून अधिक कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली आहेत.  

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com