सर्वसामान्यांना पुन्हा मोठा झटका! पेट्रोल-सिलिंडर बरोबर आता कांदाही रडवणार

सर्वसामान्यांना पुन्हा मोठा झटका!  पेट्रोल-सिलिंडर बरोबर आता कांदाही रडवणार
After petrol and diesel onion prices have gone up

नवी दिल्ली: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे जनता नाराज आहे. आता कांद्याच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्यांना रडायला लावले आहे. यामुळे देशांतील घरांचाही अर्थसंकल्पही या दरवाढीमुळे खालावला आहे. दिल्लीतील ठोक बाजारात कांदा 50 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे, तर किरकोळ भाव  65 ते 75 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचला आहे. गेल्या दीड महिन्यात कांद्याचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. 

दोन दिवसांत कांद्याच्या दरात वाढ

आशिया खंडातील सर्वात मोठ्या कांदा बाजार लासलगाव येथे कांद्याची सरासरी घाऊक किंमत गेल्या दोन दिवसांत 970 रुपयांवरून 4200 रुपये प्रतिक्विंटलवर गेल्या आहेत. नाशिकमधील लासलगाव येथून देशभरात कांदा पाठविला जातो. गोरखपूरमध्ये नाशिकहून येणारा कांदा 45 ते 48 रुपये, गुजरातमधील भावनगर येथून येणरा कांदा 40 रुपये आणि बंगालमधून येणारा कांदा 25 रुपये किलो विकला जात आहे.

म्हणूनच कांदा महाग झाला

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाले. या अवकाळी पावसाचा कांद्याच्या पिकाला मोठा फटका बसला, त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याची आवक कमी झाली. या सर्व बाबींमुळे कांद्याचे दर वाढत आहेत. इतकेच नव्हे तर डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे मालवाहतूकही वाढली आहे. यामुळे जवळजवळ सर्व काही महाग झाले आहे. खान्यापिण्याच्या पदार्थांपासून ते बांधकाम साहित्यामच्या किंमतींमध्ये 15-20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बटाटा आणि कांद्याचे दर वाढण्याचे एक कारण म्हणजे डिझेलची वाढती किंमत. ग्राहकांना या वाढत्या किंमतीचा मोठा त्रास होत आहे.

हा बदल 2020 मध्ये घडला

गेल्या वर्षातच संसदेत आवश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक मंजूर झाले होते. हे विधेयक मंजूर झाल्यापासून धान्य, बटाटे, कांदे, खाद्यतेल यासारख्या वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येत नाहीत. अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक 15 सप्टेंबर 2020 रोजी मंजूर झाले. राज्यसभेमधूनही हे विधेयक पास करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com