रिलायन्स नंतर टाटा स्टील सुध्दा सरकारच्या मदतीला धावले

रिलायन्स नंतर टाटा स्टील सुध्दा सरकारच्या मदतीला धावले
After Reliance Tata Steel also rushed to the aid of the government

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू लागली आहे. रेमडिसिव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्यामुळे महाराष्ट्रासंह अनेक राज्ये केंद्र सरकारकडे मदत मागत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनची आयात करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने 50 हजार मेट्रीक टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याचा तात्काळ निर्णय घेतला आहे. दरम्यान केंद्र आणि राज्यांच्या मदतीला टाटा स्टीलने धाव घेतली आहे. देशात निर्माण झालेली परिस्थिती पाहता टाटा स्टीलने ट्विट करत 200 ते 300 टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती दिली आहे. (After Reliance Tata Steel also rushed to the aid of the government)

‘’कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन हा अत्यंत महत्वाचा आहे. देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता आम्ही अनेक राज्यं आणि रुग्णालयांना 200 ते 300 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या कोरोनाविरुध्दच्या लढाईमध्ये आम्ही सुध्दा आहोत आणि आपण सर्वजण मिळून ही लढाई आपण जिंकू,’’ असा विश्वास टाटा स्टीलने व्यक्त केला आहे.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. गुजरातमधील जामनगर येथून महाराष्ट्राला हा ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार असून यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नसल्याचं कंपनीच्या एका कर्मचाऱ्यानं माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे.

महाराष्ट्र राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत या माहितीला दुजोरा दिला आहे. रिलायन्सच्या जामनगर प्लॅंटमधून 100 मेट्रीक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. विभागीय आयुक्त व रायगड आणि ठाणे जिल्हाधिकारी तसेच एफडीए आयुक्त यांची समन्वय समिती ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वयाचे काम करेल अशी माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे.


 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com