दिल्लीऐवजी बुराडी येथे आंदोलन करण्याचा सरकारचा प्रस्ताव आंदोलक शेतकऱ्यांनी फेटाळला

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली चलो आंदोलनाची हाक देऊन दिल्ली-हरियानाच्या सिंघू, टीकरी सीमेवर जमलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या काही गटांनी बुराडी येथे आंदोलन करण्याचा सरकारचा प्रस्ताव फेटाळला आहे. 

नवी दिल्ली :  मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली चलो आंदोलनाची हाक देऊन दिल्ली-हरियानाच्या सिंघू, टीकरी सीमेवर जमलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या काही गटांनी बुराडी येथे आंदोलन करण्याचा सरकारचा प्रस्ताव फेटाळला आहे. 

"आम्ही येथून कोठेही हलणार नाही. येथेच आंदोलन करू. सरकारला वाटत असेल तर त्यांनी येथे येऊन आमच्याशी चर्चा करावी,'' असे या शेतकऱ्यांनी ठणकावले आहे. यातील राष्ट्रीय किसान मोर्चाने मात्र पोलिसांची परवानगी मिळाल्यावर दिल्लीच्या बुराडी येथे निरंकारी मैदानात आंदोलन सुरू केले आहे.दुसरीकडे पंजाब, हरियाना, राजस्थान व उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरीही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर दाखल होऊ लागल्याने सिंघू, टीकरी, गाझियाबाद, गुडगाव व गाझीपूर या सीमांवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 
दुसरीकडे पोलिसांनी आंदोलकांना दिल्लीत प्रवेश करण्याची अनुमती दिल्यावर काही शेतकऱ्यांनी बुराडी येथील निरंकारी मैदानात आंदोलन सुरू केले असून दिल्लीतील आम आदमी पक्षातर्फे त्यांची व्यवस्था पाहण्यात येत आहे. महाराष्ट्रातील काही शेतकरीही यात सहभागी आहेत. 

 

अधिक वाचा :

आंदोलक शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत दिल्लीला जाता येऊ नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न 

संबंधित बातम्या