अमेरिकेसह 'या' देशात अग्निपथसारखी योजना लागू; कुठे काय आहेत नियम? वाचा सविस्तर

लष्करात अग्निपथ योजना लागू केल्यानंतर मोदी सरकारचा देशभरातून विरोध होत आहे.
अमेरिकेसह 'या' देशात अग्निपथसारखी योजना लागू; कुठे काय आहेत नियम? वाचा सविस्तर
ArmyDainik Gomantak

लष्करात अग्निपथ योजना लागू केल्यानंतर मोदी सरकारचा देशभरातून विरोध होत आहे. ही योजना तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. अनेक ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण लागले असून सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. तरुणांना या योजनेबद्दल पटवून देण्यासाठी, सरकारने एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, अशी योजना जगातील अनेक देशांमध्ये आधीपासून अस्तित्वात आहे. त्याचा कोणताही परिणाम होत नाही. (agnipath like schemes in many countries like america israel army recruitment india)

दरम्यान, सैन्यात अधिकारी रँकच्या निम्नस्तरीय कर्मचाऱ्यांची सर्व भरती या योजनेअंतर्गत होणार आहे. याअंतर्गत एक शिपाई चार वर्षे सेवा बजावेल. त्यानंतर 25 टक्के अग्निवीरांची नियमित केडरमध्ये भरती होईल. हे सर्व त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल. यामध्ये प्रवेशासाठी वयोमर्यादा 17.5 वर्षे ते 21 वर्षे असेल. या सैनिकांनाही वेगळा दर्जा दिला जाणार आहे.

Army
नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पाकिस्तानमध्ये उठला आवाज, मौलानांनी मुस्लिमांवर केला आरोप

तसेच, चार वर्षे पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना 11.71 लाख रुपयांचे पॅकेज दिले जाईल, जे करमुक्त असेल. त्याच वेळी, या योजनेसह, सरकारची योजना पेन्शन बिल कमी करण्याची आहे, जे सध्या सुमारे 1.19 लाख कोटी रुपये आहे. असे अनेक देश आहेत ज्यांनी यापूर्वी अशी योजना लागू केली आहे. ते कोणते देश आहेत आणि तिथे काय नियम आहेत ते जाणून घेऊया...

अमेरिका

अमेरिकेकडे (America) 1.4 दशलक्ष सैनिक आहेत. जिथे भरती स्वेच्छेने केली जाते. बहुतेक सैनिकांची भरती चार वर्षांसाठी केली जाते आणि गरज पडल्यास सैनिकांना चार वर्षांची मुदतवाढ दिली जाते. हे सैनिक पूर्ण सेवेसाठी देखील अर्ज करु शकतात आणि 20 वर्षे सेवा केल्यास पेन्शन आणि इतर लाभांसाठी देखील पात्र आहेत. जे सैनिक लवकर निवृत्त होतात त्यांना भत्ता दिला जातो.

Army
नुपूर शर्मांच्या वतीने नेदरलँडचे खासदार मैदानात, ''काही चुकीचं बोलल्या नाहीत''

चीन

चीनमध्ये (China) सैनिकांची सक्तीने भरती केली जाते. इथे दरवर्षी 4.5 लाख सैनिकांची भरती होते. चीनमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे, त्यामुळे दरवर्षी 8 दशलक्ष लोक या भरतीसाठी तयार असतात. या तत्त्वावर भरती झालेल्यांना दोन वर्षे सेवा करण्याची संधी दिली जाते, त्यापैकी 40 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. निवडीच्या नियमांच्या आधारे यातील अनेक सैनिकांना पूर्ण सेवेतही सामावून घेतले जाते. दोन वर्षे सेवा केलेल्या सैनिकांना सवलतीच्या दरात कर्ज दिले जाते जेणेकरुन ते त्यांचा व्यवसाय सुरु करु शकतील. याशिवाय त्यांना कर लाभही मिळतात.

फ्रान्स

इथे सैनिकांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाते. यासाठी अनेक भरती मॉडेल्स आहेत. एक वर्षाच्या नूतनीकरणीय करारापासून ते पाच वर्षांच्या करारापर्यंत, ज्यांचे नूतनीकरण देखील केले जाते. सैनिकांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते आणि 19 वर्षे सेवा करणाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो.

Army
पाकिस्तानमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र

रशिया

रशियामध्ये (Russia), भरतीचे हायब्रिड मॉडल वापरले जाते, ज्याच्या आधारावर सशस्त्र दलांमध्ये करार केले जातात. याअंतर्गत एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर एक वर्षाची सेवा दिली जाते. त्यानंतर त्यांना राखीव ठेवण्यात येते. यामधून त्यांना कायमस्वरुपी सैनिकाचाही दर्जा दिला जातो. या सैनिकांना लष्करी संस्थांमध्ये शिक्षण घेण्याची संधी दिली जाते.

इस्रायल

इथे प्रत्येकाने सैन्यात सेवा देणे अनिवार्य आहे. पुरुषांना किमान 32 महिने आणि महिलांना 24 महिने सेवा द्यावी लागते. या सेवेनंतर, त्यांना राखीव यादीत ठेवले जाते आणि त्यांना कधीही ड्युटीवर बोलावले जाऊ शकते. या सैनिकांना प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते. यापैकी 10 टक्के सैन्यात भरती आहेत आणि ते सात वर्षांच्या करारावर आहेत. किमान 12 वर्षांच्या सेवेनंतर सैनिक पेन्शनसाठी पात्र ठरतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com