'केंद्राला काळ्या कायद्या सारखाचं अग्निपथ देखील परत घ्यावा लागणार'- राहुल गांधी

सरकारच्या या योजनेविरोधात देशभरात मोठ्या प्रमाणामध्ये हिंसक निदर्शने होत आहेत.
'केंद्राला काळ्या कायद्या सारखाचं अग्निपथ देखील परत घ्यावा लागणार'- राहुल गांधी
Rahul Gandhi Dainik Gomantak

अग्निपथ योजना सरकारच्या गळ्यातला फास ठरत असल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या या योजनेविरोधात देशभरात मोठ्या प्रमाणामध्ये हिंसक निदर्शने होत आहेत. आता या मुद्द्यावरून राजकारणही तापत चालले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) निशाणा साधत 'ज्याप्रमाणे कृषी कायदा मागे घ्यावा लागला, त्याचप्रमाणे अग्निपथ योजना देखील मागे घ्यावी लागेल,' असे म्हटले जात आहे. (Agnipath will also have to be taken back by the central government tweeted Rahul Gandhi)

Rahul Gandhi
Agnipath Row: गृह मंत्रालयाची मोठी घोषणा, या नोकरीत मिळणार 10% आरक्षण

राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले की, "सलग 8 वर्षांपासून सरकारने 'जय जवान, जय किसान'च्या मूल्यांचा अपमान केला. पंतप्रधानांना काळा कृषी कायदा मागे घ्यावा लागेल, असं मी यापूर्वीही म्हटलं होतं आणि त्याचप्रमाणे त्याला 'माफिवीर' म्हणायला पाहिजे.' देशातील तरुणांची आज्ञा पाळत त्यांना 'अग्निपथ' परत घ्यावा लागेल असंही यावेळी गांधी म्हटले आहेत.

या ट्विटद्वारे राहुल यांनी सरकारने सैनिक आणि शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये, “सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण तरुणांच्या वेदना समजून घ्या, तसेच 3 वर्षांपासून भरती झालेली नाही, शर्यतीतील तरुणांच्या पायाला फोड आले, ते आता निराश आणि हतबल झाले आहेत.

तरुण वायुसेना भरती निकाल आणि नियुक्त्यांची वाट पाहत होते. सरकारने त्यांची कायमची भरती, रँक, पेन्शन देखील काढून घेतली, भरती थांबवली, सर्वकाही थांबवले." काँग्रेसच्या वतीने दिल्लीच्या जंतरमंतरवर अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. काँग्रेसचे हे प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर होणार असून त्यात अनेक बडे नेते आणि खासदार सहभागी होऊ शकतात अशी शक्यता वर्तावण्यात आली आहे.

Rahul Gandhi
100 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी आई हिराबेन यांचे पाय धुवून घेतले आशीर्वाद

दरम्यान, CAPF आणि आसाम रायफल्समध्ये अग्निवीरांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृहमंत्र्यांच्या कार्यालयाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरती दिली आहे. गृहमंत्र्यांच्या कार्यालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट शेअर करत लिहिले की, CAPF आणि आसाम रायफल्समधील भरतीमध्ये अग्निपथ योजनेंतर्गत 4 वर्षे पूर्ण केलेल्या अग्निवीरांसाठी 10% रिक्त जागा राखून ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com