Agra: नवर्‍याने बायकोला खांबाला बांधून काठीने मारले

Police: पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केल्याच्या रागातून जीवघेणा हल्ला
Crime
CrimeDainik Gomantak

UP: उत्तर प्रदेश मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेश मधील आग्रा मधून एक विडीओ प्रचंड वायरल होत आहे. या विडीओ मध्ये एक व्यक्ती त्याच्या बायकोला एका खांबाला बांधून तीला दांड्याने मारत आहे. सांगितल जात आहे की या महिलेने नवर्‍याच्या त्रासाला कंटाळून नवर्‍याच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात धरून भर रस्तात मारहान केली. पोलीसांच्या माहिती नुसार महिलेच्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.परंतु आरोपी फरार झाला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ही घटना आग्रा मधील सिकंदरा गावतील आहे, महिलेने केलेल्या तक्रारी नुसार पती श्याम बिहारी आणि सासू बर्फा देवी या आरोपीन विरोधात आपसी (IPC) कलम 323आणि 506 नुसार सिकंदर पोलीस स्टेशन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सांगण्यात यात आहे की ही घटना 14 जुलैला घडलेली आहे.

Crime
Nupur Sharma Raw: नुपूर शर्माचा व्हिडिओ पाहिल्यामुळे तरुणावर चाकूने वार

महिलेने सांगितलाल्या माहिती नुसार या महिलेच लग्न 17 वर्षे पुर्वी श्याम बिहारी सोबत झाल आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, पती खूप दारू पितो. त्याला विरोध केल्यावर तो तिला मारहाण करतो. 13 जुलै रोजी तीच्यावर त्याने प्राणघातक हल्लाही केला होता. ज्याची महिलेने पोलिसांकडे तक्रार केली होती. महिला तक्रार करून आल्या नंतर चिडलाल्या आरोपीनी महिलेला खांबाला बांधून काठीने मारहाण केली. आणि कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com