शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली प्रतिक्रिया

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 31 जानेवारी 2021

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या कृषी कायद्याविरोधात केलेल्या टीकेवर कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या कृषी कायद्याविरोधात केलेल्या टीकेवर कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारने केलेल्या नव्या शेती कायद्यास विरोध दर्शविला होता. त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शरद पवार यांच्या शेती कायद्यावरील विरोधासंदर्भात ट्विट करताना, शरद पवार हे एक अनुभवी राजकारणी आणि माजी कृषिमंत्री असून, त्यांना शेतीविषयीच्या समस्या आणि तोडगा याची चांगली माहिती असल्याचे म्हटले आहे. 

उद्यापासून सिनेमा हॉल, थिएटर्स व हॉटेल्स संपूर्ण क्षमतेने उघडणार; 'हे...

शरद पवार यांनी कृषी विधेयकाला दर्शवलेल्या विरोधावर कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी ट्विट करत, सरकारने केलेल्या कृषी सुधारणांसाठी स्वतः शरद पवार यांनी देखील बरेच प्रयत्न केल्याचे सांगितले आहे. मात्र शेतीच्या सुधारणांबाबत माहिती असताना देखील शरद पवार यांनी केलेल्या ट्विटमुळे निराश झाल्याचे कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवार यांचे हे ट्विट्स अज्ञान आणि चुकीच्या माहितीने केलेले असल्याचे  नरेंद्रसिंग तोमर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. याशिवाय, काही तथ्य मांडण्यासाठी एक संधी देण्याची मागणी नरेंद्रसिंग तोमर यांनी आपल्या ट्विट मधून केली आहे. 

याव्यतिरिक्त, केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या संबंधित काही तथ्य नरेंद्रसिंग तोमर यांनी मांडून, शरद पवार आपली भूमिका बदलतील आणि या कायद्याच्या फायद्यांविषयी ते शेतकऱ्यांना सांगतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

तर माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी नवीन कृषी कायद्यांच्या बाबतीत भाष्य करताना, या कायद्यामुळे एमएसपीवर उलट परिणाम होईल आणि मंडईची व्यवस्था कमकुवत होईल असे म्हटले होते. कृषी कायद्यांबाबत शेतकरी व केंद्र सरकार यांच्यात चाललेल्या चर्चेदरम्यान, शरद पवार यांनी ट्विटरवर ट्विट करून कृषी कायद्यांवर प्रश्न उपस्थित केले होते.       

संबंधित बातम्या