शेतकरी कल्याणासाठी ‘अ‍ॅग्रोवन मार्ट’ कटिबद्ध : अभिजित पवार

Agrowon Mart is committed to the welfare of farmers says Abhijit Pawar
Agrowon Mart is committed to the welfare of farmers says Abhijit Pawar

'अ‍ॅग्रोवन मार्ट' रिटेल पुरवठा साखळीचा स्वातंत्र्यदिनी प्रारंभ

पुणे: शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने पुढाकार घेतला असून त्यासाठी अ‍ॅग्रोवन मार्ट ही पुरवठा साखळी महाराष्ट्रात सुरू केली आहे. स्वातंत्र्यदिनी (ता. १५) या पुरवठा साखळीचा प्रारंभ सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या हस्ते झाला. 'अ‍ॅग्रोवन मार्ट' शेतकऱ्यांच्या सर्व गरजा भागविण्यासाठी, बळिराजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही श्री. पवार यांनी यावेळी दिली.

उदघाटनानंतर प्रातिनिधिक स्वरुपात 'अ‍ॅग्रोवन मार्ट'च्या पाच फ्रॅन्चाईझींचे वाटप करण्यात आले. यावेळी 'सकाळ'चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, ‘अ‍ॅग्रोवन'चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण आणि अ‍ॅग्रोवन अ‍ॅग्रोटेक इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश शेजवळ उपस्थित होते.

श्री. अभिजित पवार म्हणाले की, शेतकऱ्याला अद्याप सर्वांगीण स्वातंत्र्य मिळाले आहे, असे मला वाटत नाही. शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या, अडचणी आहेत. त्यांना या संकटातून सोडविण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आलो आहोत. अ‍ॅग्रोवन हे वर्तमानपत्र सुरू करून त्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले होते.

शेतकरी कल्याणासाठी ‘अ‍ॅग्रोवन मार्ट’ कटिबद्ध

आता त्याच्या पुढचे पाऊल ‘अ‍ॅग्रोवन मार्ट'च्या रुपाने टाकतो आहोत. शेतीसाठीचा खर्च कमी कसा करता येईल आणि चांगला बाजारभाव शेतकऱ्याला कसा मिळू शकेल, या दिशेनेही आम्ही काम करतो आहोत. 'अ‍ॅग्रोवन मार्ट'द्वारे आम्ही शेतकऱ्याच्या आयुष्यात परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाहीही श्री. पवार यांनी दिली. 'अ‍ॅग्रोवन मार्ट' ही रिटेल पुरवठा साखळी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये आकाराला येत आहे.

पहिल्या टप्प्यात १५८ तालुक्यांमध्ये 'अ‍ॅग्रोवन मार्ट' सुरू होत आहेत. 'अ‍ॅग्रोवन मार्ट' बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.agrowonmart.com या संकेतस्थळाला भेट द्या.

‘अॅग्रोवन'मधून शेतकऱ्यांना आवश्यक व उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिली जाते. ‘अॅग्रोवन'च्या पुढचं पाऊल म्हणजे अ‍ॅग्रोवन मार्ट! शेतीशी संबंधित पूर्ण ‘इकोसिस्टिम’उभी करण्याचा आणि शेतकऱ्याला टप्प्याटप्प्याने सर्व पातळ्यांवरील सोई-सुविधा पुरविण्याचा आमचा मानस आहे.

- अभिजित पवार, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह

शेतकऱ्याच्या दारात समृद्धी घेऊन जाण्याचे उद्दीष्ट उराशी बाळगून ‘अ‍ॅग्रोवन'ची वाटचाल सुरू आहे. त्यालाच जोडून शेतकऱ्याच्या गरजा तत्काळ भागवून त्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून देण्याचा अ‍ॅग्रोवन ॲग्रोटेक इंडस्ट्रीजचा प्रयत्न राहील.

- निलेश शेजवळ,

मुख्य कार्यकारी अधिकारी, अ‍ॅग्रोवन ॲग्रोटेक इंडस्ट्रीज

काय आहे ‘अ‍ॅग्रोवन मार्ट’?

‘अॅग्रोवन मार्ट’च्या माध्यमातून शेती आणि दुग्ध व्यवसायासाठी लागणारे सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतीसाठी आवश्यक साहित्य आणि अवजारांपासून दुग्ध व्यवसायासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूंपर्यंत सर्व काही ‘अ‍ॅग्रोवन मार्ट’मध्ये मिळणार आहे. शेतकरी, दूध उत्पादक आणि पशू वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्यांना जोडणारा दुवा म्हणूनही ‘अ‍ॅग्रोवन मार्ट’ काम करणार आहे.

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com