Gujarat मध्ये काँग्रेसला मोठा धक्का, जिग्नेश मेवाणींना तुरुंगवासाची शिक्षा

Jignesh Mevani: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
Jignesh Mevani
Jignesh MevaniDainik Gomantak

Jignesh Mevani: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे कार्याध्यक्ष जिग्नेश मेवाणी यांना अहमदाबाद येथील न्यायालयाने 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2016 मध्ये न्यायालयाने मेवाणींसह 19 जणांना सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान, गुजरात (Gujarat) विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करताना झालेल्या हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात 20 जणांना आरोपी करण्यात आले होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने शुक्रवारी आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani), सुबोध परमार, राकेश मेहरिया यांच्यासह 19 जणांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणात दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने (Court) शिक्षा सुनावली आहे. पहिल्या प्रकरणात त्यांना 6 महिने तुरुंगवास, दुसऱ्या प्रकरणात 500 रुपये आणि तिसऱ्या प्रकरणात 100 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com