''सरकार शेतकऱ्यांना चिनी सैन्याप्रमाणे वागणूक देत आहे''

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

नवीन कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यानंतर आता एआयएमआयएम पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

नवीन कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यानंतर आता एआयएमआयएम पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून उभारलेल्या तटबंदीवरुन बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारला धारेवर धरल्याचे संसदेत पाहायला मिळाले. सरकारने अरुणाचल प्रदेशाऐवजी शेतकरी आंदोलन करत असलेल्या टिकरी, सिंघू आणि गाजीपूर याठिकाणी पायभूत सोयीसुविधा निर्माण केला असल्याचा टोला असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे. 

असदुद्दीन ओवैसी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर निशाणा साधताना, सरकारचे शेतकऱ्यांसोबतचे वर्तन हे ते चीनचे सैनिक असल्यासारखे असल्याचे म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन कायदे रद्द करून सरकारने अहंकार सोडणे गरजेचे असल्याचे असदुद्दीन ओवैसी यांनी पुढे म्हटले आहे. त्यानंतर सीमारेषेवर चीनने पायाभूत सोयीसुविधा आणि सैन्याची जमवाजमव सुरूच ठेवली असून, बर्फ वितळल्यावर चीनने पुन्हा एकदा भारतीय सैनिकांवर आक्रमण केल्यास सरकार यावर कोणती उपाययोजना करत असल्याचा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत केला. 

देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं माहितीय? अखिलेश यादवांचा पंतप्रधान मोदींना टोला

चीनने भारताच्या 20 जवानांना शहीद केले. आणि त्यानंतर देखील चीनला उत्तर न देता भारत शांत बसल्याचे असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत बोलताना म्हटले आहे. आणि भारत अजूनही लडाख मधील पीपी 4 व पीपी 8 याठिकाणी गस्त घालू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर अरुणाचल प्रदेशात चीनने अख्ये गाव वसवले असून, सरकार यावर बोलण्याची हिंमत दाखवत नसल्याची टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.     

याव्यतिरिक्त, सिक्कीमच्या नकुला भागात चीन घुसखोरी करत आहे. आणि सरकार व खासकरून पंतप्रधानांना कशाची भीती वाटत असल्याचे असदुद्दीन ओवैसी यांनी पुढे म्हटले आहे. यानंतर चीन भारताची भूमी दिवसेंदिवस बळकावत असून, पंतप्रधान चीनचे नाव काढण्यास तयार नसल्याचा टोमणा त्यांनी मारला आहे. आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभाराचे उत्तर देताना पंतप्रधान चीनचे नाव घेऊन धैर्य दाखवतील अशी आशा व्यक्त करत असल्याचे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.    

संबंधित बातम्या