चीन-पाकिस्तानच्या जेएफ-17 पेक्षा तेजस शक्तीशाली - वायूसेना प्रमुख 

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

चीन आणि पाकिस्तान  यांनी एकत्रित मिळून बनवलेले लढाऊ विमान जेएफ-17 पेक्षा भारतीय बनावटीचे तेजस विमान अधिक चांगले आणि प्रगत असल्याचे प्रतिपादन भारतीय हवाई दलाचे प्रमुख आर के एस भदौरिया यांनी आज केले.

चीन आणि पाकिस्तान  यांनी एकत्रित मिळून बनवलेले लढाऊ विमान जेएफ-17 पेक्षा भारतीय बनावटीचे तेजस विमान अधिक चांगले आणि प्रगत असल्याचे प्रतिपादन भारतीय हवाई दलाचे प्रमुख आर के एस भदौरिया यांनी आज केले. याशिवाय पाकिस्तान मधील बालाकोट येथे करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे कोणतेही लक्ष्य भेद करण्यासाठी तेजस हे आधुनिक भारतीय जेट अधिक सुसज्ज असल्याचे वायुसेनाप्रमुखांनी स्पष्ट केले. 

भारतीय वायू सेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनी आज दिलेल्या मुलाखतीत, भारत सरकारने मंजुरी दिलेल्या नव्या 83 देशी लढाऊ तेजस विमानांमध्ये अस्त्र सारख्या स्वदेशी बियॉंड व्हिज्युअल रेंज मिसाईलने सज्ज राहणार असल्याचे सांगितले. अस्त्र हे भारतीय बनावटीचे एअर टू एअर मिसाईल असून, त्याची निर्मिती डीआरडीओने केलेली आहे. याशिवाय तेजस या लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टची तुलना चीन आणि पाकिस्तान यांनी बनवलेल्या जेएफ-17 या विमानाशी करताना आपले हे स्वदेशी बनावटीचे विमान बरेच प्रगत आणि शक्तिशाली असल्याचे एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनी नमूद केले. 

प्रतिकूल परिणामासाठी सीरम व भारत बायोटेकला द्यावी लागणार नुकसान भरपाई 

याव्यतिरिक्त, पाकिस्तानातील बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्ट्राईक पेक्षा आगामी येऊ घातलेल्या तेजस विमानांमध्ये स्टँडऑफ शस्त्रास्त्रांची क्षमता अधिक राहणार असल्याचे  एअर चीफ मार्शल यांनी सांगितले. व त्यामुळे ही विमाने प्रगत आणि कोणत्याही परिस्थितीत हवेत झेप घेण्यासाठी उत्तम असणार आहेत, असे ते म्हणाले. त्यानंतर तेजस विमानाच्या सर्वात मोठ्या स्वदेशी संरक्षण खरेदी करारामुळे, भारतीय हवाई दलातील तेजसच्या दोन स्क्वाड्रनची संख्या आता पुढील काळात सहा पर्यंत पोहचणार असल्याचे वायुसेना प्रमुखांनी पुढे सांगितले. तसेच या करारामुळे, भारतीय वायू सेनेची क्षमता देखील मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, स्वदेशी उद्योगालाही चालना मिळणार असल्याचे आर के एस भदौरिया यांनी अधोरेखित केले. 

दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळाच्या समितीने 83 एलसीए तेजस मार्क 1ए लढाऊ विमानांच्या खरेदीला हिरवा कंदील दिला होता. सरकारने 48,000 कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या स्वदेशी संरक्षण खरेदी करारास मंजुरी दिली होती. त्यानंतर आता येत्या काही दिवसांत एचएएलबरोबर हा करार होणार आहे.      

संबंधित बातम्या