एअर इंडियाचा मोठा निर्णय: ब्रिटनला जाणारी आणि येणारी विमानं केली रद्द

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 21 एप्रिल 2021

24 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान नवे निर्बंध लागू असणार आहेत.

देशात कोरोनाचे रग्ण आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू या दोन्हींमध्य़े मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर इतर काही देशांनी भारतातून येणाऱ्या आणि भारतात जाणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली असताना, एअर इंडियानं (Air India) ब्रिटनला जाणाऱ्या आणि ब्रिटनहून येणाऱ्या सगळ्या प्लाईट्स रद्द केल्या आहेत. 24 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान नवे निर्बंध लागू असणार आहेत. एअर इंडियाने आपल्या सोशल मिडियावरील ट्विटर आकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन सरकारने घातलेल्या निर्बंधानंतर भारतातील आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर मोठा परिणाम झाला असल्याचं दिसून आलं आहे. (Air Indias big decision Canceled flights to and from Britain canceled)

‘’जवाहरलाल नेहरु इंचार्ज नाहीत, नरेंद्र मोदी आहेत’’

एअर इंडियानं बुधवारी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन दिलेल्या माहितीनुसार, ‘’ब्रिटनला जाणाऱ्या आणि येणाऱ्या एअर इंडियाच्या प्लाईट्स 24 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. तिकिटांच्या परताव्यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल,’’ असं ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची आकडेवारी आता चिंताजनकरीत्या वाढू लागली आहे. गेल्या 24 तासामध्ये देशात 2,95,041 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 2023 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 1,67,457 जणांना डिस्चार्ज देण्या आला आहे. देशामध्ये आत्तापर्यंत 1 कोटी 32 लाख 36 हजार 39 रुग्ण उपचारानंतर ठिक झाले आहेत. देशात सध्या 21 लाख 57 हजार 538  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या