काल सुधारलेली दिल्लीतील हवेची गुणवत्ता आज पुन्हा 'खराब'

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

काल वाऱ्याच्या वेगामुळे सुधारलेली दिल्लीची हवा आज पुन्हा 'खराब' पतळीवर घसरल्याचे निदर्शनास आले.

नवी दिल्ली : काल वाऱ्याच्या वेगामुळे सुधारलेली दिल्लीची हवा आज पुन्हा 'खराब' पतळीवर घसरल्याचे निदर्शनास आले. दिवाळीनंतर गेले काही दिवस दिल्लीची हवा 'अतिखराब' पातळीवर घसरली होती, त्यानंतर दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या वाऱ्याच्या वेगामुळे हवेचा दर्जा सुधारल्याचे दिसून आले, मात्र आज राजधानी दिल्लीतील हवेचा दर्जा पुन्हा घसरला.

सध्या थंडी वाढत असून, कोरोनाही वाढत असताना दिल्लीतील हवेची गुणवत्ता घसरणे ही गंभीर बाब आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच फुफ्फुस आणि हृदयाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींनी हिवाळ्याच्या मोसमात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत मास्क वापरणे अनिवार्य आहे.

अधिक वाचा :

कन्येसह आपल्याला पुन्हा नजरकैदेत ठेवल्याचा मेहबुबा मुफ्तींचा दावा

हजरत निझामुद्दीन ते मडगाव राजधानी एक्‍सप्रेस २६ डिसेंबरपर्यंत रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर, सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

संबंधित बातम्या