विमान कंपन्यांना हालगर्जीपणा भोवला; केजरीवाल सरकारची तडक कारवाई

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 एप्रिल 2021

महाराष्ट्रामधून दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केलेले असताना चार विमान कंपन्यांनी यामध्ये हालगर्जीपणा दाखवला आहे.

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिल्लीमध्ये कोरोनानं अक्षरश: थैमान घातलं आहे. गेल्या काही आठवड्य़ांपासून दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या कमालीची वाढली असून आरोग्य व्यवस्था कोलमडायला लागली आहे. त्यामुळे केजरीवाल सरकार(Kejriwal government) कोरोना नियमांच्या बाबतीत अधिक आक्रमक झालं आहे. महाराष्ट्रामधून दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केलेले असताना चार विमान कंपन्यांनी यामध्ये हालगर्जीपणा दाखवला आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारने या चारही विमान कंपन्यांविरुध्द तक्रार दाखल केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.(The airlines were overwhelmed Kejriwal governments crackdown)

अरविंद केजरीवाल यांच पंतप्रधान मोदींना पत्र

महाराष्ट्रासंह अनेक राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर दिल्ली सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून महाराष्ट्रामधून दिल्लीकडे येणाऱ्या प्रवाशांना कोरोना  निगेटिव्ह रिपोर्ट प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. त्याशिवाय दिल्लीमध्ये प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. असं असताना चार विमान कंपन्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट तपासले नसल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर केजरीवाल सरकारने इंडिगो, विस्तारा, स्पाईस जेट आणि एअर एशिया या चार विमान कंपन्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर या विमान कंपन्यांविरुध्द गुन्हाही दाखल केला आहे.

 

संबंधित बातम्या