अजय सेठ:  अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे नवे सचिव

अजय सेठ:  अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे नवे सचिव
ajay seth.jpg

नवी दिल्ली :  दिल्लीतील अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे नवे सचिव म्हणून अजय सेठ यांनी पदभार स्वीकारला. अजय सेठ हे यापूर्वी बेंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते.  अजय सेठ हे 1987 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी (IAS)आहेत.  देशातील कोरोना महामारीमुळे  संपूर्ण अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. अशा संकटाच्या काळातच अजय सेठ यांच्या खांद्यावर अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाची मोठी जबाबदारी आली आहे. (Ajay Seth: New Secretary, Department of Economic Affairs, Ministry of Finance) 

अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. अजय सेठ यांनी अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला आहे." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 6 एप्रिल 2021रोजी अजय सेठ यांच्या नवीन आर्थिक व्यवहार सचिवपदाच्या नियुक्तीस मान्यता दिल्याचे या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.  तसेच, यापूर्वी अजय  सेठ बंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. चे व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते.

2000 ते 2004 या काळात वित्त मंत्रालयात खर्च विभाग आणि आर्थिक व्यवहार विभागाचे उपसचिव व संचालक पदावरही कार्यरत होते. 2004 ते 2008 पर्यंत ते एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) कार्यकारी संचालकांचे सल्लागार होते.  अजय सेठ यांच्यापुर्वी तरुण बाबज हे र्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव सचिव होते. आता तरुण बजाज यांची नियुक्ती अर्थ मंत्रालयातील महसूल सचिव या पदावर करण्यात आली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com