आता PUB-G नाही...FAU-G

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार एक नवीन गेमिंग अ‍ॅप लॉन्च करणार आहे. या गेमचे नाव FAU-G असे आहे.

नवी दिल्ली: तरुणाईला वेड लावलेला PUB-G गेम बंद केल्याने तरुणाई मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याचे दिसून आले होते. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार एक नवीन गेमिंग अ‍ॅप लॉन्च करणार आहे. या गेमचे नाव FAU-G असे असून या गेमच्या मिळकतीचा 20% निधी हा जवानांना देण्यात येणार असल्याचे अक्षयने आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे. 

या गेमचं पूर्ण नाव फिअरलेस अ‍ॅन्ड यूनायटेड गार्ड्स आहे. तसेच हा गेम पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला पाठिंबादेखील देणार आहे. अक्षय कुमारने या गेमबाबत घोषणा करताच, सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पबजी बॅन केल्यानंतर फक्त दोन दिवसांच्या कालावधीतच हा गेम कसा तयार करण्यात आला, यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

संबंधित बातम्या