Gujarat: जगभरात मद्यपान केले जाते, मग गुजरातमध्ये बंदी का? आप नेत्याचा सवाल

Gujarat Liquor Ban: गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.
 leader
leaderDainik Gomantak

Gujarat Liquor Ban: गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत आम आदमी पक्षाने पंजाबनंतर आता गुजरातवर लक्ष केंद्रित केले आहे. यातच आता 'आप' च्या उमेदवाराने बुधवारी असा दावा केला की, 'मद्यपान करणे ही वाईट गोष्ट नाही.' सोमनाथ मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार जगमल वाला म्हणाले की, 'जगभरातील लोक मद्यपान करतात, तर मग केवळ गुजरातमध्येच बंदी का घातली जाते. अगदी डॉक्टर, आयएएस आणि आयपीएस अधिकारी मद्यपान करतात.'

'जगभरात मद्यपान केले जाते'

जगमल वाला पुढे म्हणाले की, 'गुजरात (Gujarat) व्यतिरिक्त संपूर्ण देशात मद्य स्वातंत्र्य आहे, म्हणूनच मद्यपान वाईट नाही. परंतु आपण मद्यपान केले तर ते वाईट आहे. जगभरातील देशांमध्ये मद्यपान केले जाते. 196 देशांमध्ये मद्यपान केले जाते. दुसरीकडे, देशात गुजरात व्यतिरिक्त सर्व राज्यांमध्ये मद्यपान आणि सेवनावर बंदी नाही. म्हणून अल्कोहोल वाईट नाही.'

 leader
Gujarat: लागली रे लॉटरी ! बँक खात्यात आले 11677 कोटी रुपये, काही तासांत लाखोंची कमाई

भाजपच्या लक्ष्यावर आप नेते

यातच, आता आप नेत्याच्या या वक्तव्यावर भाजपने (BJP) हल्लाबोल केला आहे. गुजरातला बदनाम करण्याचा प्रयत्न आम आदमी पक्षाकडून (Aam Aadmi Party) केला जात आसल्याचा आरोप भाजपने केला आहे.

'अधिकारी देखील मद्यपान करतात'

आपच्या नेत्याच्या मते, डॉक्टर, आयएएस आणि आयपीएस अधिकारी मद्यपान करतात. तथापि, जगमल वाला यांनी इशारा दिला की, अल्कोहोलचे अत्यधिक वापर हे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com