बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

वादग्रस्त ढाचा पाडण्याची घटना पूर्वनियोजित नसून ती अचानक घडली होती, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटल़े आहे. न्यायाधीश एस. के. यादव यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.

लखनऊ- बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील सर्व ३२ आरोपींची सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. वादग्रस्त ढाचा पाडण्याची घटना पूर्वनियोजित नसून ती अचानक घडली होती, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटल़े आहे. न्यायाधीश एस. के. यादव यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.

अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांकडून बाबरी मशीद पाडण्यात आली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, राज्यसभेचे माजी खासदार विनय कटियार यांच्यासह एकूण 49 जणांचा या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये समावेश होता. त्यामधील 16 जणांचा याआधीच मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, या घटनेतील सर्व आरोपींनी मशीद पाडण्यासाठी कारस्थान रचले. तसेच कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली, असा सीबीआयचा युक्तिवाद होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रे पुरावा म्हणून सादर केली होती. 

 

संबंधित बातम्या