आता सगळ्यांनाच मिळणार मोफत कोरोना लस..!

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

केवळ बिहारच नाही, तर देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्यात येईल, असं वक्तव्य केंद्रिय मंत्री प्रताप सारंगी यांनी केलं.

भुवनेश्वर: केवळ बिहारच नाही, तर देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्यात येईल, असं वक्तव्य केंद्रिय मंत्री प्रताप सारंगी यांनी केलं. मतदान पेटीवर लक्ष ठेऊन केवळ बिहार नव्हे तर, देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती.

या आठवड्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका सुरू होणार असल्याने, मतदान पेटीवर लक्ष ठेऊन मोफत लस देण्याची घोषणा करत, भाजप या महामारीचा उपयोग मतं मिळवण्यासाठी करत असल्याचा आरोप  विरोधी पक्षांनी केली होता. भाजपच्या जाहिरनाम्यात असलेल्या या मुद्द्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली होती.

पंतप्रधान मोदी यांनी २० ऑक्टोबर रोजी एका दूरध्वनी दूरध्वनीद्वारे संबोधताना सांगितले की भारतीय वैज्ञानिक कोरोनावरील अनेक लसी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्या क्लिनिकल ट्रायल्सच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत.
 

संबंधित बातम्या