दोन कोटींची जमीन 18 कोटींना; राम मंदीर जमिनीच्या खरेदीत घोटाळ्याचा आरोप

दोन कोटींची जमीन 18 कोटींना; राम मंदीर जमिनीच्या खरेदीत घोटाळ्याचा आरोप
Ram mandir janmbhumi.jpg

राम मंदिर ट्रस्टवर राम मंदिरसाठी जमीन खरेदी करण्यात मोठा घोटाळा केला असल्याचा अरोप करण्यात येत आहे. समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षाने वेगवगेळ्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी ही जमीन काही दिवसांपूर्वी फक्त दोन करोड रुपयांत विकत घेतली होती. त्यानंतर ही जमीन 18.5 करोड रुपयांना विकल्याने मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. तर अशा आरोपांबद्दल चिंता नसल्याची भूमिका चंपतराय यांनी व्यक्त केली आहे. (Allegation of scam in purchase of Ram Mandir land)

समाजवादी पक्षाचे नेते आणि पूर्व मंत्री पवन पांडे यांनी अयोध्याच्या जमिनीचे दस्तऐवज दाखवत ही जमीन पुजारी हरीश पाठक आणि त्यांची पत्नीने 18 मार्चच्या सायंकाळी सुलतान अन्सारी आणि रवी मोहन यांना विकली होती. तीच जमीन काही मिनिटांत चंपतराय यांनी रान जन्मभूमी ट्रस्टच्या नावे 18.5 करोड रुपयांना विकत घेतली होती. 

अखिलेश यादव सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या पवन पांडेय यांनी सांगितले की, आपण या प्रकरणी भ्रष्टचाराचे आरोप करत आहोत. असे कोणते कारण होते  ज्यामुळे  10 मिनिटांत दोन करोडची ती जमीन 18.5 करोड रुपयांना विकली गेली. त्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी लखनऊमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आरोप  केले आहे. यावेळी त्यांनी ही जमीन काही मिनिटांत एवढी महाग झाली असा प्रश्न उपस्थित केला आहे. भारत काय तर जगात देखील एखादी जमीन अचानक एवढी महाग होऊ शकत नाही. 

या खरेदी घोटाळ्यात ट्रस्टवर देखील आरोप झाले आहे, कारण रवि मोहन आणि मुस्लिम असलेल्या सुलतान अन्सारी यांनी विकत घेतलेल्या जमीनच्या नोंदीमध्ये ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा आणि संघाशी संबंधित असलेल्या ऋषिकेश उपाध्याय हे या घोटाळ्याचे पुरावे असल्याचे सांगितले जाते आहे.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com